आलटून पालटून सत्ता भोगणाऱ्या साखर सम्राटांची मस्ती जिरवण्यासाठी विधानसभा लढवायची,जनतेच्या प्रश्नासाठी आता माघार नाही,हर्षदाताई काकडे यांचा बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात निर्धार

आलटून पालटून सत्ता भोगणाऱ्या साखर सम्राटांची मस्ती जिरवण्यासाठी विधानसभा लढवायची,जनतेच्या प्रश्नासाठी आता माघार नाही,हर्षदाताई काकडे यांचा बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात निर्धार

 

(सुनिल नजन/चिफब्युरो/ अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रस्थापित साखर सम्राट हे गेल्या पन्नास वर्षांपासून आलटून पालटून सत्ता उपभोगत आहेत.यांची मिली भगत आहे.या निवडणुकीत त्यांची सत्तेची मस्ती जिरवण्यासाठी कोणत्याही परीस्थितीत विधानसभा निवडणुक लढवायचीच,जनतेच्या प्रश्नासाठी आता माघार नाही,असा खणखणीत ईशारा देत नवीन बांधकाम कामगार संपर्क कार्यालय व जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने आयोजित निर्धार मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. आणि साखर सम्राटाच्या विरोधात आसुड ओढत विधानसभा निवडणुक रिंगणात उडी घेतली आहे. आजी माजी आमदारावर जोरदार टीका करत निवडणूक मैदान गाजवायला सुरुवात केली आहे. या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी डॉ शिवाजीराव चोरमले हे होते. सौ काकडे पुढे म्हणाल्या की तुम्ही एकदा नवीन चेहऱ्याला संधी द्या तुमच्या प्रश्नाला बांधील राहून संपूर्ण मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलून टाकीन. साखर सम्राट हे फक्त सत्तेसाठी तुमचा वापर करून घेत आहेत. निवडणूका आल्या की हे बीळातून बाहेर येतात आणि यांना सामान्य लोकांची आठवन येते. सत्तेवर जाताच लाभ देताना सगे सोयरे दिसतात.ज्यांनी सन २०१४ साली आमचे विधानसभा निवडणुकीचे तिकीट चोरून नेले त्यांनी आम्हाला गाडायचेच काम केले आहे.आमचे तिकीट कापले गेले तरीही त्यावेळी आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहून माझ्या वरुर जिल्हा परिषद गटातून सर्वात जास्त मत विद्यमान आमदारांना मिळवून दिली.पण पुढे जिल्हा परीषदेच्या निवडनुकीत आमचे जिल्हा परीषदेचे तिकीट कापून आमचे खच्चीकरण करण्याचे काम केले. पण आम्ही जनशक्तीच्या माध्यमातून निवडणूक लढवून निवडूण आलो.आता निवडणूक ही फक्त जनतेच्या प्रश्नासाठी लढवायची आहे. आता माघार घेतली जाणार नाही. यावेळी विष्णु दिवटे, जनशक्ती विकास आघाडीचे महासचिव जगन्नाथ गावडे, माणिक गर्जे,सुनिल चव्हाण, सचिन नागापूरे,लक्ष्मण गवळी, ह.भ.प.फटांगडे महाराज, विनायक देशमुख, अशोक पातकळ यांनी आपले विचार व्यक्त केले.जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष अँडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी माजी आमदारावर टिका करताना सांगितले की शरदचंद्रजी पवार साहेब यांनी दहीगावकरांना सर्व पदे दिली. साखर कारखाना,जिल्हा बँक, आमदारकी, राज्य शिखर बँक, जिल्हा परिषद अध्यक्ष पद दिले. तरीही यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांची साथ सोडली. हे माजी आमदार महोदय ज्या पवार साहेबांनी एवढे देऊनही हे त्यांचे होउ शकले नाहीत तर ते तुमचे आमचे गोरगरीबांचे काय होणार आहेत.असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे जनतेने त्यांना चांगले ओळखले आहे. आता सौ.हर्षदा काकडे यांना दोन्ही तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या सर्व सामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. आता जनताच प्रस्थापितांना घरचा रस्ता दाखवून घरी बसविल्या शिवाय राहणार नाही.आणि सौ काकडेंना थेट विधानसभेत सामान्य लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी पाठवणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. या मेळाव्या साठी गहीणीनाथ थोरे,महेश दौंड, उबेद आतार,धनराज घोडके, सुरेश चौधरी, अशोक ढाकणे, पंडीत नेमाने, अतूल केदार, नामदेव ढाकणे, भागवत भोसले, नितीन कुसळकर,रामकिसन सांगळे, अकबर शेख,माणिक काळे, लक्ष्मण टाकळकर, मधुकर गोरे, भागचंद आठरे,सुरेश कुटे,अशोक शिरसाठ, रंगनाथ ढाकणे, संजय काकडे, नामदेव कसाळ,सचिन आधाट,भारत लांडे, राजेंद्र पोटफोडे,गणेश गर्जे, रमेश दिवटे, गणेश उगले, देविदास गिर्हे,यांच्या सह शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील कार्यकर्ते,व महिला प्रतिनीधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.प्रिती भोजनाने या निर्धार मेळाव्याची सांगता झाली.