पाथर्डी येथे गोकुळभाउ दौंड यांच्या कार्यालयात “माझी लाडकी बहीण” या योजनेचे मोफत फाँर्म भरणा केंद्र सुरू

पाथर्डी येथे गोकुळभाउ दौंड यांच्या कार्यालयात “माझी लाडकी बहीण” या योजनेचे मोफत फाँर्म भरणा केंद्र सुरू

 

(सुनिल नजन” चिफब्युरो”अहमदनगर जिल्हा) भारतीय जनता पार्टीचे भटक्या विमुक्त सेलचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष गोकुळ भाउ दौंड यांच्या पाथर्डी येथील कार्यालयात एक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तेथे शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे मोफत फाँर्म भरून घेण्यात येत आहेत. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील गरजू महीलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून ही सुविधा दौंड यांनी उपलब्ध करून दिली आहे. सौ.सुनिताताई गोकुळ दौंड या पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती असताना त्यांचा पाथर्डी तालुक्यातील अनेक बचतगटातील महीलांशी चांगला जनसंपर्क आलेला आहे. महीलांची अडचण ओळखून युवा नेते गोकुळभाऊ दौंड यांनी तालुक्यातील गोरगरीब महीलासाठी ही मोफत सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.तरी संपूर्ण शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील महीलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा नेते गोकुळ भाउ दौंड यांनी केले आहे.आज पर्यंत अनेक महीलांनी या योजनेचे आँनलाईन फाँर्म भरून दिलेले आहेत.ज्यांनी अजूनही या योजनेचे फाँर्म भरून दिलेले नाहीत त्यांनी आपली कागदपत्रे घेऊन येउन त्वरित संपर्क साधून आपले फाँर्म ३१ आँगष्टच्या अगोदर भरावेत असे आवाहन दौंड यांनी केले आहे.