वाघोली येथील मयत नितीन पवार अपघात प्रकरणातील संशयित आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या 

वाघोली येथील मयत नितीन पवार अपघात प्रकरणातील संशयित आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

 

(सुनिल नजन/ “चिफब्युरो”/स्पेशल क्राईम रिपोर्टर,अहमदनगर जिल्हा) पाथर्डीतील बुलेट मोटार सायकल व डंपर अपघातात मयत झालेल्या नितिन संजय पवार वय (27) रा.वाघोली,ता.शेवगाव, जिल्हा अहमदनगर यांच्या म्रुत्युस कारणीभूत ठरलेल्या आणि फरार झालेल्या डंपर चालकाच्या पाथर्डी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याबाबतची माहिती अशी की दि.11.7.2024 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सौ.रेणुका नितीन पवार व नितिन संजय पवार हे नव दाम्पत्य आपली बुलेट मोटारसायकल क्र.mh 16 da 9164 या गाडीने पाथर्डी हुन तिसगाव कडे चालले होते. समोरून मुरुमाने भरलेला विना नंबर चा टाटा कंपनीचा डंपर येत होता.त्याने मोटारसायकल स्वारास जोरदार धडक देऊन पळून गेला होता.जोरदार धडक लागल्याने मोटार सायकल वर बसलेले नितीन संजय पवार हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या पत्नी रेणुका नितीन पवार या गंभीर जखमी झालेल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात हलवन्यात आले होते. दरम्यान अपघात करून फरार झालेला डंपर चालक आस्लम जावेद शेख रा.माळीबाभुळगाव ता.पाथर्डी याच्या पाथर्डी पोलिसांनी भल्या पहाटे मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी मयताचे चुलत बंधू निलेश राजेंद्र पवार वय (31)रा.वाघोली ता.शेवगाव, जिल्हा अहमदनगर यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 711/2024 कलम 105,281,125(अ),125(ब),324(2)मोटार वाहन कायदा कलम 184,134,(अ)(ब)177 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे.सदर डंपर हा संदिप वाखुरे यांच्या मालकीचा होता असे पोलीस तपासात तोंडी निष्पन्न झाले आहे. दरम्यान म्रुतांच्या नातेवाईकांनी मोठा अकांड तांडव करीत पोलिसांच्या कार्य पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत वरीष्ठांची भेट घेतली होती.परंतु पोलिसांना तपास करण्यासाठी थोडा फार तरी वेळ पाहिजे होता असे पोलिसांचे म्हणणे होते. पाथर्डी पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शना खाली उपनिरीक्षक मुलगीर साहेब हे पुढील तपास करीत आहेत.संशयित आरोपीच्या झोपेतच मुसक्या आवळण्याचे काम पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.संशयित आरोपीला पाथर्डी न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्याला काही दिवसांची पोलिस कष्टडी दिली आहे.