अमोल शिंदेंचा यशस्वी पाठपुरावाआणि प्रत्यक्षात महामार्गावर ब्रेकर तयार करण्यास सुरुवात

अमोल शिंदेंचा यशस्वी पाठपुरावाआणि प्रत्यक्षात महामार्गावर ब्रेकर तयार करण्यास सुरुवात

 

पाचोरा-

 

गेल्या अनेक वर्षापासून पाचोरा शहरालगत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग नंबर जे ७५३ यावर कॉलेज चौक पासुन ते जळगाव चौफुली दरम्यान सतत अपघात होताना दिसत आहेत.या ठिकाणी वेळोवेळी गतिरोधक टाकण्यासाठी भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी मागणी केली होती.निवेदन दिले प्रत्यक्षात संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन पाठपुरावा केला.यामध्ये प्रामुख्याने दिनांक ६ एप्रिल २०२२ रोजी अमोल शिंदे यांनी मा.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष गतिरोधक समिती यांची भेट घेऊन प्रत्यक्षात निवेदन देऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली व या महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे गांभीर्य मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले होते.

तद्नंतर मा.जिल्हाधिकाऱ्यांनी देखील हा विषय गांभीर्याने घेऊन दिनांक २ मे २०२२ रोजी प्रकल्प संचालक NHAI (PIU) धुळे डिव्हिजन यांना पत्र लिहून यासंदर्भात सुचित केले होते.नंतर सदर प्रकल्प संचालकांनी दि.९ जुन २०२२ रोजी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग धुळे यांना पत्र लिहून यासंदर्भात माहिती मागवली व त्यावर मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष गतिरोधक समिती यांच्याकडे जिल्हा गतिरोधक समितीची बैठक होऊन यावरती गतिरोधक टाकण्याबाबत निर्णय झाला.

सदर गतिरोधक बसवण्याचा निर्णय होऊन देखील बराच कालावधी उलटून गेला परंतु ब्रेकर बसविण्याचे काम प्रत्यक्षात सुरू होत नसल्याने भारतीय जनता युवा मोर्चा पाचोऱ्याच्या वतीने या संदर्भात दिनांक ०३ जुलै २०२४ रोजी पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले तसेच संबंधित अधिकाऱ्यांना अमोल शिंदे यांनी धारेवर धरल्यानंतर दि.१७ जुलै २०२४ रोजी प्रत्यक्षात ब्रेकर बसवण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे पाचोरा शहरातील नागरिकांनी अपघातापासून सुटकेचा श्वास घेतला असून भारतीय जनता पार्टी व अमोलभाऊ शिंदे यांनी केलेल्या पाठपुरामुळे पाचोरा शहरातील नागरिकांकडून आभार व्यक्त होत आहेत.