श्री. सु.भा. पाटील प्राथमिक विद्या मंदिराची  जागतिक साक्षरता दिन दिनानिमित्त “साक्षरता दिंडी”

श्री. सु.भा. पाटील प्राथमिक विद्या मंदिराची  जागतिक साक्षरता दिन दिनानिमित्त “साक्षरता दिंडी”

 

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. सु.भा. पाटील प्राथमिक विद्या मंदिराची जय-जय राम-कृष्ण हरी,ज्ञानबा-तुकाराम,जय हरी विठ्ठल, झाडे लावा झाडे जगवा, शिकलेली आई घरादाराला पुढे नेई च्या जयघोषात आषाढी एकादशीनिमित्त  “आनंदवारी”🚩,जागतिक साक्षरता दिन दिनानिमित्त “साक्षरता दिंडी”📔 व पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी 🌱”वृक्षदिंडी”🌴 काढण्यात आली. मुख्य इमारतीतील सकाळ सत्र व दुपार सत्राची दिंडी देशमुख वाडी,छत्रपती शिवाजी महाराज चौक,जामनेर रोड, सोनार गल्ली,गांधी चौक तर भडगाव रोड विभागातील दिंडी साईनगर, एमआयडीसी कॉलनी,आप्पासो.ओं.ना.वाघ नगर, कालिका नगर,भास्कर नगर,गाडगेबाबा नगर, भडगाव रोड ते शाळा अशी संपन्न झाली. शालेय समिती चेअरमन बापूसो.जगदीश पंडितराव सोनार व सौ. जयश्रीताई सोनार यांच्या हस्ते बाल विठ्ठल-रुक्मिणीचे पूजन करून दिंडीचे स्वागत करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल- रुक्मिणीच्या तसेच इतर महान संतांच्या व वारकरीच्या वेषात येऊन दिंडीची शोभा वाढवली. विद्यार्थिनीनी डोक्यावर तुळस व वृक्षाची रोपे घेऊन पर्यावरण वाचवा असा संदेश दिला.रॅलीततील साक्षरतेविषयीचे व पर्यावरणाविषयीच्या बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. दिंडीचे विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तदनंतर बाल वारकऱ्यांनी शाळेच्या मैदानावर सुंदर असा रिंगण सोहळा पार पाडला. विद्यार्थी व शिक्षकांनी फुगडी खेळून दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांना प्रसाद रुपी गोड बिस्किटांचे वाटप करण्यात आले. दिंडीस पालकांचा देखील उदंड प्रतिसाद लाभला. प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.उज्वला साळुंखे मॅडम उपस्थित होत्या.दिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.