महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पाचोरा शहर नूतन कार्यकारिणी जाहीर 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पाचोरा शहर नूतन कार्यकारिणी जाहीर

 

 

पाचोरा येथील दिनांक 13 जुलै रोजी पाचोरा शासकीय विश्राम गृह येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली.यावेळी नूतन कार्यकरनी जाहीर करण्यात आली.यावेळीनवीन सदस्यांना नियुक्ती पत्र देत सत्कार करून शुभेछा देण्यात आल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, प्रदेशाध्यक्ष मा. वसंतराव मुंडे, राज्य संघटक मा. संजय भोकरे, राज्य महासचिव मा. डॉ. विश्वास राव आरोटे, राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर जी रायसाकडा यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली असून १) दिलीप पाटील यांची पाचोरा तालुका उपाध्यक्षपदी २) मुजम्मिल शेख भडगाव शहर शहराध्यक्ष पत्रकार हल्ला कृती समिती ३) जावेद शेख पाचोरा पत्रकार हल्लाकृती समिती उपाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली ४) स्वप्निल कुमावत यांची पाचोरा शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या वेळी खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा खान्देश विभागीय कार्याध्यक्ष अबरार मिर्झा,खान्देश विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाने, खानदेश विभागीय संपर्कप्रमुख राकेश सुतार यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देत सत्कार करत निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील पत्रकार व सामाजिक हिताच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष, नागराज पाटील,उपाध्यक्ष नंदकुमार शेलकर,पाचोरा ता अध्यक्ष प्रवीण ब्राम्हणे, शहर अध्यक्ष राजेंद्र खैरनार,तसेच सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार अनिल आबा येवले हे सर्व उपस्थित होते.