स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विरोधात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री,पोलीस महासंचालक,यांच्या कडे तक्रार,कारवाई न झाल्यास खा. निलेश लंके यांचा उपोषणाचा इशारा

  1. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विरोधात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री,पोलीस महासंचालक,यांच्या कडे तक्रार,कारवाई न झाल्यास खासदार निलेश लंके यांचा उपोषणाचा इशारा

 

(सुनिल नजन /स्पेशल क्राईम रिपोर्टर/अहमदनगर जिल्हा) अहिल्यानगरचा(अहमदनगर) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेशजी लंके यांनी या विभागाच्या संशयास्पद कारभाराच्या विरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री,देवेंद्र फडणवीस,अजितदादा पवार,पोलिस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक यांच्या कडे लेखी तक्रार केली असून त्या तक्रारीत त्यांनी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विरोधात हप्तेखोरीच्या बाबतीत फार गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर,उपनिरीक्षक सोपान गोरे,यांच्यावर हप्ते गोळा करण्याचे आरोप करण्यात आले आहे. त्यांना रविंद्र आबासाहेब कर्डिले, शहाजी आढाव,अमोल भोईटे, रणजित जाधव,रोहित मिसाळ, विजय ठोंबरे, शिवाजी ढाकणे, सचिन आडबल,मनोज गोसावी, बापू गोसावी हे मदत करीत आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते विजय वडीवट्टीवार,अंबादास दाणवे, राज्याचे पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात अहमदनगरचे खासदार निलेश लंके, यांनी असे नमूद केले आहे.दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारीचा जिल्हा म्हणून नगर जिल्ह्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. आँनलाईन मटका, बीफ मटण,आँनलाईन क्लब, वाळू तस्करी, गुटखा विक्री, अवैध दारू विक्री, गांजा विक्री, चंदन तस्करी, बींगो,प्रवासी पाकिटमारी,भुरट्या चोऱ्या,वाटमारी, रस्त्यावरील ढाब्यावर चालणारा खुलेआम वेश्या व्यवसाय,गावठी कट्टे विक्री हे उद्योग पोलिसांच्या मदतीने आणि आशिर्वादाने सुरू आहेत असे खा.लंके यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी व अधिकारी, हे सामांन्य जनतेला वेठीस धरीत आहेत. ते जिल्ह्यातील सुवर्णकार,दुकानदार, व्यवसाय करणारे सराफ, व्यावसायीक,यांना दमदाटी करून खोट्या गुन्ह्यात अडकवू असे धमकावतात.जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारी मुळे सर्व सामान्य नागरिकात सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गैरप्रकारामुळे अनेक लोकांचे प्रपंच उध्वस्त झाल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिक खासदार लंके साहेब यांच्या कडे लेखी स्वरूपात करीत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांची विषेश दर्जा असणाऱ्या अधिकाऱ्या मार्फत चौकशी करून दोषींवर सात दिवसात कडक कारवाई करून जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय बंद करावेत. अशी मागणी खासदार लंके साहेब यांनी केली आहे. आर्थिक लोभापायी दोन आस्थापनांचा कारभार, रवींद्र कर्डिले यांची शिर्डीच्या साई मंदिरातील सुरक्षा विभागात नेमनूक असताना देखील तात्पुरत्या स्वरूपात सायबर सेलकडे अहमदनगर येथे बदली करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व सायबरसेल हे दोन आस्थापना विभाग असतानाही दोन्ही शाखेचा कारभार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडे कसाकाय आहे? स्थानिक गुन्हे शाखेत अनेक गुन्हे प्रलंबित आहेत. हा सारा कारभार संशयास्पद असुन केवळ आर्थिक लोभापायी दोन्ही शाखेचा कारभार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या कडे आहे. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा मास्टर माईंड रविंद्र कर्डिले याच्यावर काही वर्षापुर्वी स्थानिक गुन्हे शाखेत काम करीत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. ती केस जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच नगर शहरातील एका गुन्ह्यामध्ये राज्य गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत चौकशी सुरू आहे. कर्डिले याच्या वर अनेक गुन्हे दाखल असुनही तो पोलिसावर दबाव तंत्राचा वापर करतो.तरीही पोलिस खात्याकडून त्याच्यावर कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली जात नाही ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे खासदार निलेश लंके यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे. जिल्ह्यातील अनेक ढाब्यावरील अवैध दारु विक्रीस प्रथम लगाम घालन्यात यावा असेही लंके यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे. लोकसभा निवडणुकीत खा.लंकेना मदत केलेल्या अवैध दारूविक्री करणाऱ्या ढाबेवाल्यांनाही आता आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान खासदार निलेश लंके साहेब यांनी हप्तेखोर पोलीस अधिकाऱ्याच्या नावाच्या यादीची मिडिया समोर जाहीर वाच्यता केली होती.संबंधित हप्तेखोर अधिकाऱ्यांच्या विरोधात सात दिवसात कोणत्याही स्वरूपाची कारवाई न झाल्यास अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसन्याचा ईशारा खासदार लंके साहेब यांनी दिला आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस खात्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राँकेशजी ओला साहेब या संदर्भात नेमकी काय कारवाई करतात याकडे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.अवैध व्यवसाय करणाऱ्या माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.