शेतकऱ्याचे लेकरांच भविष्य अंधारात घालणार्या स्थानिक रहिवासी व दारुड्या जि.प.शिक्षकांची जिल्हा बाहेर बदली करा – शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष आनंद जिवणे पाटील

शेतकऱ्याचे लेकरांच भविष्य अंधारात घालणार्या स्थानिक रहिवासी व दारुड्या जि.प.शिक्षकांची जिल्हा बाहेर बदली करा – शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष आनंद जिवणे पाटील.

——————————————–

देवणी (ता.प्र.) – तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षणाची दयनीय अवस्था झाली आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेची व शेतकरी वर्गाची लेकर या विद्यामंदिरात ज्ञानार्जनासाठी जात आहेत. या लेकरांचे भविष्य आज अंधारात गेले आहे. याचे कारण म्हणजे स्थानिक रहिवासी शिक्षकांची येथे मक्तेदारी वाढली आहे. केंव्हाही येणे जाणे, एकमेकांच्या सहकार्याने कोणाची दांडी, कोणाची रजा,आयत्या वेळी सादर करता येईल असा रजेचा अर्ज देऊन स्वकामावर राहणारे शिक्षक.फक्त अन् फक्त चालू दिसण्यापुरतीची शाळा सुरु असे प्रकार सद्याला देवणी तालुक्यात आहेत. कांही शिक्षक महाशय विद्यार्थ्यांना दारूच्या नशेत शिकवत असताना दिसून येतील ईतकी किळसवानी परीस्थिती येथील शिक्षणाची होवुन बसलेली आहे. देवणी हा दारुड्या शिक्षकांचा तालूका म्हणून ओळख निर्माण झाली आहे. स्वतःच्या गावात तसेच तालुक्यातील आपल्या जवळपासच्या गावात वाममार्गाने ईच्छित जागा मिळवून येथील जि.प. शिक्षकांनी देवणी तालुक्याच्या शिक्षणाचा “आईचा घो” कलेला आहे. यासोबतच गावच्या राजकारणात यांनी बोटं करीत आपल्या हस्तक्षेपाने गावागावात तंटे निर्माण केले आहेत. या शिक्षक महाशयांनी स्वगृही वास्तव्यात राहून शासनाची दिशाभूल व फसवणूक करून वेतना सोबतच घरभाडे ऊचललेले आहेत. यांच्याकडून घरभाडे रक्कमेची वसुली व्याजासकट करीत यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. शेतकर्यांच्या लेकरांच भविष्य अंधारात घालणार्या या देवणी तालुक्यातील स्थानीक रहिवासी व दारुड्या शिक्षकांची तात्काळ लातूर जिल्ह्याच्या बाहेर बदली करण्याच्या मागणी सोबत देवणी तालुक्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे यासाठी गुणवान, चारित्र्यवान, गुणवत्ता धारक शिक्षकांची देवणी तालुक्यातील जि.प.शाळेतून नियुक्त्या कराव्यात अशी हि मागणी शिक्षण अधिकारी लातूर यांना गट शिक्षण अधिकारी देवणी यांच्या मार्फत दिनांक नऊ जुलै रोजी दिलेल्या लेखी निवेदनातून शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष आनंद जिवणे ऊर्फ पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे. या निवेदनाची तात्काळ गांभीर्याने दखल घेवून कार्यवाही करावी अन्यथा यासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करील असा इशारा ही त्यांनी दिला आहे. या निवेदनावर शेतकरी संघटनेचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष श्रीमंतअण्णा लुल्ले,लातूर जिल्हा कार्याध्यक्ष योगेश तगरखेडे, सेवानिवृत शिक्षक तथा केंद्र प्रमुख भगवानराव बिरादार गुरूजी,मनोज पाटील आदींच्या स्वाक्षर्या आहेत.