चोपडा महाविद्यालयात आषाढ मासानिमित्त गीत गायन कार्यक्रम उत्साहात संपन्न
चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयात संगीत विभागातर्फे आषाढ मासानिमित्त गीत गायनाचा सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे उदघाटन खानदेशातील सुप्रसिद्ध कवी अशोक निळकंठ सोनवणे यांच्या शुभहस्ते नटराज मूर्तीचे पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. एल. चौधरी, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, रजिस्ट्रार डी.एम.पाटील, संगीत विभागाचे प्रमुख किशोर खंडाळे व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.एच जी. चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी संगीत विभाग प्रमुख किशोर खंडाळे तसेच जयेश महाजन, दीपक दंडगव्हाण सर, प्रगती कोळी, साक्षी पारधी, निशा कोळी, यश महाजन, गणेश कोळी, विवेक जोशी, दिपाली पाटील मॅडम, विशाल सपकाळे इत्यादींनी आपल्या सुरेल आवाजात भक्ती गीते तसेच भाव गीतांचे गायन करून श्रोत्यांची दाद मिळविली. या गीत गायन कार्यक्रमासाठी पियानो वादक सहाय्यक प्राध्यापक स्वप्निल सोनवणे, तबलावादनासाठी विवेक जोशी, बासरी वादनासाठी यश महाजन, गिटार वादनासाठी जयेश महाजन यांची साथ संगत लाभली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कस्तुरबा शाळेच्या शिक्षिका दिपाली पाटील यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन आणि शालेय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.