प्रकाश तेली यांचे काव्य संग्रह समाजासाठी दिशादर्शक – आर. एस. काँकरा

प्रकाश तेली यांचे काव्य संग्रह समाजासाठी दिशादर्शक – आर. एस. काँकरा

 

जळगांव:- प्रकाश रामदास तेली यांचे काव्य संग्रह समाजासाठी दिशादर्शक आहेत असे पुणे येथील केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राचे संचालक आर. एस. काँकरा यांनी प्रकाश तेली यांना पाठविलेल्या शुभकामना संदेशात म्हटले आहे.

 

काय म्हटले आहे आर. एस. काँकरा यांच्या शुभकामना संदेशात:- पाणी हा आपल्या जीवनाचा सर्वात महत्वाचा घटक आहे आणि सजीव सृष्टीचे अस्तित्व हे पाण्यावर अवलंबून आहे याची वस्तुस्थिती श्री प्रकाश तेली यांनी त्यांच्या “पाणी” या काव्यसंग्रहात अतिशय सर्जनशील रीतीने दाखवली आहे ते अत्यंत प्रशंसनीय आहे. पाणी वाचवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे हे या काव्यसंग्रहात अतिशय मार्मिक पद्धतीने अधोरेखित करण्यात आले आहे.

 

श्री प्रकाश तेली हे एक सामाजिक कवी आहेत त्यांचे आतापर्यंत एकूण 12 सामाजिक कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत हे सर्व काव्य संग्रह समाजाला नवी दिशा देण्याचे काम करीत आहेत ‘पाणी’ या काव्यसंग्रहात पाण्याचे महत्त्व, जलसंधारण आणि पाणी बचतीची गरज याचे विवरण अतिशय सुंदर, सोप्या आणि संक्षिप्त पद्धतीने केलेले आहे आणि ते प्रत्येक प्रत्येकाच्या हृदयाला भिडते.

 

श्री प्रकाश तेली यांनी जल आणि जलसंधारणावर 150 कविता व 100 घोषवाक्य लिहिलेल्या आहेत ते जलसाक्षरता अभियानात मोलाची भूमिका बजावतील यात शंका नाही. गेल्या अनेक वर्षांपासून श्री प्रकाश तेली जलसाक्षरता आणि जनजागृती मोहीम राबवत आहेत साहित्य आणि इतर माध्यमांतून ते सातत्याने जलसंधारणासाठी प्रयत्न करीत आहेत ही आनंदाची बाब आहे आणि त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास पात्र आहे.

 

‘पाणी’ या काव्यसंग्रहात श्री प्रकाश तेली यांनी पैशापेक्षा ही पाणी जास्त महत्त्वाचे आहे याचे अतिशय मार्मिक असे विश्लेषण केलेले आहे. त्यांच्या साहित्य कार्यामुळे जलसंधारण आणि जलसाक्षरता अभियानास अधिक गती आणि प्रेरणा मिळेल यात तिळमात्र शंका नाही त्यांनी सर्व कविता संग्रह सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून लिहिले आहेत.

 

श्री प्रकाश तेली यांच्या कविता आणि घोषवाक्य सर्वांना सहज समजतात त्यांच्या लेखनशैलीत कमालीची सहजता आणि साधेपणा आहे श्री प्रकाश तेली हे विलक्षण कार्य करत आहेत. त्यांच्या साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक कार्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो असे आर. एस. काँकरा यांनी त्यांना पाठविलेल्या शुभकामना संदेशात म्हटले आहे.

 

प्रकाश तेली यांचे प्रकाशित झालेले 12 काव्य संग्रह पुढीलप्रमाणे :- प्रकाश तेली यांनी 5000 कविता व 7000 घोषवाक्य लिहिले असून त्यांचे आता पर्यंत 12 काव्य संग्रह प्रकाशित झालेले आहेत ते पुढील प्रमाणे 1) सड़क सुरक्षा 2) बाल-विवाह 3) बढ़ती जनसंख्या 4) किसान 5) वोट 6) नदी-भारत की जलधारा 7) वोट – 2 8) वोट-3 9) खाद्य सुरक्षा 10) वोट-4 11) पानी 12) मन की बात हे प्रकाशित झालेले आहेत.