पाचोरा पीपल्स बँक तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

पाचोरा पीपल्स बँक तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

(पाचोरा प्रतिनिधी अनिल आबा येवले) – पाचोरा पीपल्स बँक ही पाचोरा तालुक्यातील एकमेव अशी संस्था आहे की ज्या ठिकाणी पाचोरा तालुक्यातील सर्व शेतकरी व्यापारी यांच्या मोठ्या उलाढाली होत असतात या बँकेमार्फत अनेक छोट्या मोठ्या सभासदांना कर्ज पुरवठा करीत असतात तसेच वसुलीत सुद्धा ही बँक कुठलीही तडजोड न करता किंवा कुठलाही संचालक हस्तक्षेप न करता वसुली ही बँकेच्या दृष्टिकोनातून व सभासदांच्या हितासाठी व बँक ही नफा वाढवा यासाठी व वसुलीवर अधिक भर देत असतात तसेच दरवर्षी जनरल वार्षिक मीटिंग घेऊन सभासदांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतात तसेच त्यांचे आणि अडचणी सोडवण्यासाठी चेअरमन व्हाईस चेअरमन हे सर्वांना सहकार्य करीत असतात तसेच कोरोना काळापासून गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरवाचा व सत्काराचा कार्यक्रम थांबलेला होता पण नवीन आलेल्या सर्व संचालक मंडळ यांनी पुन्हा निर्णय घेऊन यावर्षी दहावी बारावी ग्रॅज्युएट असलेले 70% च्या पुढे सभासदाच्या पाल्यांना बक्षीस दिले पाहिजे या दृष्टिकोनातून पुन्हा यावर्षी गुणवंताचा सत्कार करण्याचा निर्णय वार्षिक जनरल सभेत चेअरमन श्री अतुल संघवी व्हाईस चेअरमन श्री प्रशांत अग्रवाल एडवोकेट श्री अविनाश भालेराव श्री प्रकाश पाटील श्री भागवत मालपुरे श्री जीवन जैन श्री शरद पाटे श्री विकास वाघ, प्राध्यापक डॉ अस्मिता ताई पाटील,श्री अविनाश कुडे श्री देवेंद्र कोटेचा एडवोकेट श्री स्वप्निल पाटील इत्यादी सर्व संचालकांनी निर्णय घेऊन त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आज घेतला यावेळी अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन श्री.सी.एन.चौधरी यांनी केले.व आभार ॲड.अविनाश भालेराव यांनी केले.