युवा सेने तर्फे कृष्णापुरी भागातील विज समस्या बाबत निवेदन जिल्हा सरचिटणीस मयुर महाजन करणार शिवसेना स्टाईलने आंदोलन

येत्या आठ दिवसांत पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील विज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी झाले नाही तर युवा सेना जळगाव जिल्हा सरचिटणीस मयुर महाजन शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार…!

 

 

पाचोरा प्रतिनिधी आज पाचोरा शहरातील कृष्णापुरी त्र्यंबकनगर भागातील विज पुरवठा खंडित होण्यासंबधीत

मा. कार्यकारी अभियंता म.रा.वि. म. कपनी पाचोरा यांना समस्या निराकरणासाठी अर्बन क्रमांक 2मधील कृष्णापुरी भागातील विज पुरवठा खंडित होण्या संबधीत ….

 

“‘वरील विषयास अनुसरून मयुर महाजन युवा सेना जळगाव जिल्हा सरचिटणीस यांनी अर्ज व निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे की गेल्या महीनाभरापासून आमच्या कृष्णापुरी भागातील वीज ही वेळोवेळी रात्री बेरात्री बंद पडत असते. विद्युत उपकरणे खराब होण्याची शक्यता असते तसेच गोरगरिब मेहनत करून रात्री उजागरा मुळे त्रस्त झाले आहेत,आपण पावसाळ्या आधी प्रभागाप्रमाणे लोडशेडींग करुन सर्व कामे ही केली गेली होती तरी पण तेच कारण सांगून नेहमी आमच्या भागात वीजेचा लपंडाव हा चालु असतो दिवसाचे ठिक आहे पण यात रात्री सुद्धा विज पुरवठा जाण्याचे प्रमाण जास्त आहे आणि गेल्यानंतरही जबाबदार अधिकारी याची दखल घेत नाही तसेच वायरमन कर्मचारी यांचा फोन बंद घेत असतो व लागला तरीही उचलत नाही, हे गेल्या महीन्या भरापासून चालु आहे या संबधी आम्ही तक्रारही केली पण कोणत्या ने प्रकारची अंमलबजावणी संबधीत अधिका-यांकडून झाली नाही. त्यामुळे मी मयुर महाजन युवा सेना जळगाव जिल्हा सरचिटणीस आपणास या अर्जाद्वारे सुचित करतो की येत्या आठवड्‌यात वरील समस्येचे निराकरण झाले पाहीजे अन्यथा शिवसेना स्टाईलने पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन करू याची आपण दखल घ्यावी. यावेळी युवासेना जिल्हा सरचिटणीस मयूर महाजन,शहर प्रमुख सूरज शिंदे ,प्रदीप वाघ,अनिल पाटील,दीपक पवार,सचिन माळी, मुकेश शेलार,आशिष धनगर,संदीप पाटील ,ललित पुजारी आदी उपस्थित होते