प्रकाश तेली यांच्या पानी काव्य संग्रहाचे राष्ट्रीय जल अकादमी कडून प्रशंसा

 

 

 

जळगांव:- प्रकाश तेली यांनी लिहिलेल्या पानी ह्या काव्य संग्रहाचे राष्ट्रीय जल अकादमी चे संचालक मिलिंद पानपाटील यांनी प्रशंसा केली असून तसे प्रशंसा पत्र त्यांनी प्रकाश तेली यांना पाठविले आहे.

 

काय म्हटले आहे त्यांनी त्यांच्या पत्रात:- प्रकाश तेली यांचा पानी काव्य संग्रह वाचून खुप आनंद झाला त्यांनी पानी सारख्या अत्यंत महत्वपूर्ण विषयांवर अतिशय सुंदर अश्या कविता लिहिल्या आहेत ज्या हृदयाला स्पर्श करतात आणि त्यांच्या सर्व कविता ह्या जलसंरक्षण आणि जल साक्षरता अभियानास नक्कीच हातभार लावण्यात मोलाची भूमिका बजावतील.

 

प्रकाश तेली हे सामाजिक कवी असून त्यांची लेखन शैली रचनात्मक आणि आनोखी अशी आहे त्यांच्या सामजिक कवितांमधून त्यांचे राष्ट्र प्रेम हे स्पष्ट दिसते. प्रकाश तेली हे सामाजिक साक्षरतेचे जे काम करीत आहेत त्याची खरी गरज आज समाजाल आहे असे त्यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.

 

प्रकाश तेली यांनी पानी काव्य संग्रहात पानी बचतीचे महत्त्व, पाण्याचा उपयोग याचे अतिशय सुंदर आणि मार्मिक असे विवरण पानी काव्य संग्रहात केलेले आहे असे त्यांनी त्यांना पाठविलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

 

प्रकाश तेली यांनी 5000 सामाजिक कविता व 7000 सामाजिक घोषवाक्य हे लिहिलेले आहेत.