विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आमदार राजळे यांच्या कासार पिंपळगावात गावात सौ. हर्षदाताई काकडे यांचे जोरदार स्वागत

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आमदार राजळे यांच्या कासार पिंपळगावात गावात सौ. हर्षदाताई काकडे यांचे जोरदार स्वागत

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”अहमदनगर जिल्हा) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यात अहमदनगर जिल्हा ही अग्रेसर आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार म्हणून भाजपच्या मोनिकाताई राजळे या गेल्या दहा वर्षापासून नेतृत्व करीत आहेत. त्यांचे पारंपरिक विरोधक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे प्रांतिक सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनीही विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले ही विधानसभा निवडणूकीची जोरदार तयारी करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव झालेल्या वंचित आघाडीनेही विधानसभा निवडणुकीत पुन्हा नशीब अजमावन्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती म्हणून राहीलेल्या सौ.सुनिता दौंड यांचे पती भाजपचे युवा नेते गोकुळ दौंड यांनी ही कोणत्याही परीस्थिती विधानसभा निवडणुकीत ताकदीनिशी उतरण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. ज्ञानेश्वर कारखान्याचे चेरमन व माजी आमदार नरेन्द्र घुले, आणि त्यांचे सुपुत्र शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती क्षितिज घुले यांनी ही राष्ट्रवादीच्या शरदचंद्रजी पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत शेवगाव येथे मेळावा घेऊन निवडणूक लढवन्याचे संकेत दिले आहेत. निवडणूकीत घुले बंधू पैकी एक उमेदवार निश्चित आहे. आणि अजूनही बरेच हौशे नवशे असताना अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ.हर्षदाताई काकडे यांनी ही विधानसभा निवडणुकीत रणशिंग फुंकून निवडणूक कार्यालयाची उभारणी करून प्रत्यक्ष मतदारसंघात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी वर जोर दिला आहे. भाजपच्या विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांच्या कासार पिंपळगावात जाउन अप्रत्यक्षरित्या आमदार राजळेंना शह देण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे.कासार पिंपळगावात राजळे परीवार,भगत परीवार, म्हस्के परीवार,तिजोरे परीवार,साखरे परीवाराने सौ हर्षदाताई काकडे यांचे जोरदार स्वागत करीत निवडणूकीत मदत करण्यासाठी आश्वासन दिले आहे. आमदार राजळे यांच्या कासार पिंपळगावात सौ. काकडेंचे जोरदार स्वागत पाहून राजकीय निरिक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.गेल्या दहा वर्षापुर्वी स्व.राजीव राजळे यांनी आपला राजकीय फंडा वापरून भाजपाने काकडेना आमदारकीचे दिलेले तिकीट कापून ते विद्यमान आमदार मोनिकाताई राजळें यांना दिले होते याचे शल्य अजूनही काकडे परीवाराने उराशी बाळगून कोणत्याही परीस्थितीत आमदाकीची निवडणूक लढवायचीच हा नारा देत प्रचाराची पहीली फेरी पुर्ण केली आहे. लोकांचा उत्साह पाहून काकडेंच्या पंखात चांगलेच बळ निर्माण झाले आहे. आमदार राजळेंच्या गावात जाउन प्रचलीत कार्यकर्ते काकडेच्या समुहात सामिल करून घेण्यात सौ.काकडेंना यश आले आहे.