तिसगाव सह राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाच्या प्रश्ना संदर्भात आमदार तनपुरे ची विधानसभेत लक्षवेधी
(सुनिल नजन”चिफब्युरो” अहमदनगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रात गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अतिक्रमण हटवन्याच्या मुद्द्यावर गाजत आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील चारशे कुटुंबांना जिल्हा परीषदेने अतिक्रमण हटवण्या साठीच्या नोटीसा दिलेल्या आहेत.ही अतिक्रमणाची कारवाई झाल्यास संबंधीत कुटुंबे ही उघड्यावर पडणार आहेत.ऐनवेळी पावसाळ्यात गोरगरिबांना रहायला जागा मिळणार नाही. त्यांचे संसार उघड्यावर पडू नये म्हणून शासनाने ही कारवाई जून ते सप्टेंबर पर्यंत थांबवावी आणि सरकारने तशा आशयाचे आदेश जिल्हा परीषदेला द्यावेत. संपूर्ण महाराष्ट्रातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढून गोरगरिबांना न्याय मिळवून द्यावा अशी लक्षवेधी सुचना राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मांडून सरकारचे लक्ष वेधले आहे. तिसगाव मधिल काही लोक या अतिक्रमणाच्या विरोधात न्यायालयात गेले होते त्यामुळे न्यायालयाने सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवन्याचे आदेश दिल्यामुळे अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले होते. परंतु पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे अतिक्रमण धारकांना किमान चार महिने म्हणजे सप्टेंबर पर्यंत दिलासा मिळाला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राजक्त दादा तनपुरे यांनी या संदर्भात विधानसभेत आवाज उठवून अतिक्रमण धारक गोरगरीबांना न्याय मिळवून देण्याचा योग्य प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहेत.दरम्यान महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या गेटसमोर निदर्शने करून सरकार विरोधात घोषणाबाजी करत आपला निषेध नोदवला.