पाचोरा जक्शन प्रवेशद्वारावर ऐतिहासिक असलेले PJ रेल्वे इंजिन बसवून जंक्शन च्या सौंदर्यात भर द्यावी दिलीप पाटील यांची मागणी 

पाचोरा जक्शन प्रवेशद्वारावर ऐतिहासिक असलेले PJ रेल्वे इंजिन बसवून जंक्शन च्या सौंदर्यात भर द्यावी दिलीप पाटील यांची मागणी

 

भुसावळ विभागातील रेल्वे सल्लागार समिती सदस्यांची 172 वी बैठक आज दिनांक 26 जून बुधवार रोजी दुपारी 3 वाजता भुसावळ येथील मध्य रेल मंडळ कार्यालयात भुसावळ विभागाचे भुसावळ रेल प्रबंधक (Drm) इती पांडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यात भुसावळ मंडळातील विविध स्टेशन वरील समस्या व सूचना सदर स्टेशन वरील सल्लागारांकडून जाणून घेत त्या तात्काळ सोडविण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले.

यात पाचोरा जंकशन वरील विविध समस्या व सूचना रेल्वे सल्लागार दिलीप पाटील यांनी मांडल्या, तसेच या तात्काळ सोडवून प्रवाशी वर्गाला दिलासा द्यावा अशा सूचना पाटील यांनी भुसावळ मंडळाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

यात प्रमुख्याने

 

 

पाचोरा जंकशन प्रवेशद्वारावर ऐतिहासिक असलेले PJ रेल्वे इंजिन बसवून जंकशन च्या सौंदर्यात भर दव्हावी यासाठी प्रयत्न करावेत.

पाचोरा स्टेशन वरील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना उत्कृष्ठ कार्य पुरस्काराने गौरविण्यात यावे. पाचोरा स्टेशन वर कोच पोझिशन इंडिकेटर, Announcement सिस्टिम, CCTV कॅमेरे लावली जावीत, wifi कार्यान्वित करावे. तसेच 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस, व 11113 देवळाली भुसावळ मेमू या ट्रेन्स च्या वेळेत बदल करून पूर्ववत वेळ करण्यात यावी, पाचोरा चाळीसगाव स्टेशन वरून Up and Down side ने धावणाऱ्या काही महत्वाच्या ट्रेन्स ला थांबा देण्यात यावा.

मेमू ट्रेन मध्ये सुरु असलेल्या म्युसिकल आवाज कमी करण्यात यावा.

अशा विविध समस्या व नवीन सूचनांचे निराकारण होणेबाबत सुचविण्यात आले.