वीर जवान माजी सैनिक संस्था पाचोरा तर्फे निवेदन देऊन जाहीर निषेध

जामनेर येथे पोलिस बांधवांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध तसेच अल्प वयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी म्हणून वीर जवान माजी सैनिक संस्था पाचोरा तर्फे निवेदन देऊन जाहीर निषेध

 

पाचोरा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक पवार साहेब यांना जामनेर येथे पोलिस बांधवांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध तसेच अल्प वयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी म्हणून वीर जवान माजी सैनिक संस्था पाचोरा तर्फे निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आणि पाचोरा शहरातील बेशिस्त वाहतूकिस आळा बसावा म्हणून ही विनंती करण्यात आली, या प्रसंगी वीर जवान माजी सैनिक संस्था पाचोरा चे अध्यक्ष दीपक पाटील,उपाध्यक्ष मधुकर पाटील, सदस्य दत्तू खरे, संदीप पाटील, दिलीप पाटील,भागवत पाटील, किशोर पाटील, रवींद्र पवार, सुशील शिंदे, धर्मराज पाटील उपस्थित होते.