सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त कृष्णापुरी ते पंढरपूर पायी दिंडी रवाना

सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त कृष्णापुरी ते पंढरपूर पायी दिंडी आज दिनांक 24जुन सोमवारी रवाना…

मा. नगरसेवक संजय बापु एरंडे यांनी पंढरपूर मठात पायी दिंडीतील भाविकांसाठी साबुदाण्याची खिचडी च्या फराळ ची सेवा गेल्या “तेवीस”वर्षांपासून जोपासली परंपरा

 

(पाचोरा प्रतिनिधी) कृष्णापुरी ते पंढरपूर पायी दिंडी रवाना….

पाचोरा येथील कृष्णापुरी भागातील विठ्ठल मंदिराच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून काढण्यात येणारी पंढरपूर पायी दिंडी आज सोमवार दिनांक 24 रोजी सकाळी विठुरायाचा जयघोषात मार्गस्थ झाली.

ह.भ.प. गोविंदजी महाराज वरसाडेकर यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल मंदिरात पूजा , आरती व पादुका पूजन करून दिंडी पायी निघाली . या दिंडीत शहर व तालुक्यातील महिला व पुरुष भाविक वारकरी सहभागी झाले आहेत.भडगाव रोड भागातील कैलादेवी मंदिरात दिंडीचे स्वागत करण्यात आले. डॉ अनिल देशमुख , निर्मला देशमुख ,प्रा. सी.एन.चौधरी,मा.नगरसेवकसंजय बापू एरंडे , जगदीश भाईसाब अग्रवाल यांच्या हस्ते हरिभक्त परायण गोविंद महाराज व प्रमुख ज्येष्ठ वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दिंडीचे प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प.गोविंद महाराज चौधरी यांच्या हस्ते दिंडीच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या डॉ अनिल देशमुख ,ह.भ.प.योगेश महाराज , चंद्रकांत शेलार , प्रा.सी.एन. चौधरी , जगदीश अग्रवाल यांचा नारळ देऊन सन्मान करण्यात आला.दिंडीत सहभागी वारकऱ्यांना बटाटे चिवडा व राजगिरा लाडूचा फराळ देण्यात आला. याप्रसंगी टाळ , मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करण्यात येऊन दिंडी पुढे निघाली .ही दिंडी 19 दिवसां आषाढी एकादशीच्या दोन दिवस अगोदर पंढरपूर येथे पोहोचणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी संजय बापू एरंडे यांच्या वतीने पंढरपूर येथे सर्व भाविकांना साबुदाण्याची खिचडी फराळ देण्यात येते ही अन्नदान सेवेची परंपरा मा. नगरसेवक संजय बापु एरंडे यांनी गेल्या 20 ते 25 वर्षांपासून जोपासली आहे.