चोपडा महाविद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात साजरा

चोपडा महाविद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात साजरा

 

चोपडा:येथील म.गां.शि.मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एकक, राष्ट्रीय छात्र सेना व जिमखाना विभागातर्फे ‘१० व्या आंतरराष्ट्रीय योग दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

या कार्यक्रमासाठी योग शिक्षिका सौ.लीना वसंत पाटील यांना मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आलेले होते.या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी तसेच उपप्राचार्य प्रो.डॉ.ए. एल.चौधरी, उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, वसंत पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका डॉ.क्रांती क्षीरसागर यांनी करून दिला. या नंतर योगशिक्षिका लीना पाटील यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिके करत त्या प्रत्येक आसनांचे महत्व उपस्थितांना पटवून सांगितले.

या कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी विशाल हौसे यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमोल पाटील विजय शुक्ल, सुधाकर बाविस्कर यांचे सहकार्य लाभले.यावेळी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील बहुसंख्य शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.