चोपडा महाविद्यालयातील ‘खेळाडूंची पॉवर लिफ्टिंग’ स्पर्धेत उत्तुंग भरारी

चोपडा महाविद्यालयातील ‘खेळाडूंची पॉवर लिफ्टिंग’ स्पर्धेत उत्तुंग भरारी

 

चोपडा:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ सुरेश जी.पाटील महाविद्यालयाच्या जिमखाना विभागातील पॉवर लिफ्टिंग या क्रीडा प्रकारासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत तामिळनाडू फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी, चेन्नई येथे दि.२० ते २५ मे २०२४ या दरम्यान संपन्न झालेल्या ऑल इंडिया पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी ४ मुली व ३ मुले असे एकूण ७ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत या खेळाडूंनी अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केली. या सहभागी खेळाडूंपैकी सोनवणे अश्विनी अरविंद या महिला खेळाडूने ४७ किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले. त्याचप्रमाणे पुरुष गटातील सोनवणे पवन संजय या खेळाडूने ५९ किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील महाले कल्पेश संजय, कोळी कल्पेश सुखदेव, सोनवणे गायत्री संजय, पाटील चमेली राजेंद्र, व पाटील कावेरी शशिकांत या सर्व खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली. या सर्व यशस्वी खेळाडूंचे महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी . ए. सूर्यवंशी या सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते या सर्व खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. एल.चौधरी, उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ. के. एन. सोनवणे, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनीही सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले.

या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा संचालक डॉ. सौ. क्रांती क्षीरसागर आणि प्रशिक्षक कुणाल गोयर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे जिमखाना विभागातील अमोल पाटील, आर.एच. पाटील व एस.एच. बाविस्कर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.