“दिल्लीला जाण्याआधी या मतदाराला लंकेजी भेटून जा” जनतेची आर्त हाक! मढीच्या दत्त आश्रमात, टाकळीतील हनुमान मंदिरात आणि कासार पिंपळगावातील भगत वस्तीत खासदार लंकेचे जोरदार स्वागत

“दिल्लीला जाण्याआधी या मतदाराला लंकेजी भेटून जा” जनतेची आर्त हाक! मढीच्या दत्त आश्रमात, टाकळीतील हनुमान मंदिरात आणि कासार पिंपळगावातील भगत वस्तीत खासदार लंकेचे जोरदार स्वागत

 

(सुनिल नजन/ “चिफब्युरो” अहमदनगर जिल्हा) अहिल्यानगर ३७ (अहमदनगर) दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित तुतारीवाले राष्ट्रवादीचे खासदार निलेशजी लंकेसाहेब यांचे पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील दत्त आश्रमात,कानिफनाथ गडावर, टाकळीतील हनुमान मंदिरात, आणि कासार पिंपळगाव येथे भगत वस्ती येथे खासदार निलेशजी लंके यांचे वाजत गाजत जोरदार स्वागत करण्यात आले. प्रथम मढीच्या कानिफनाथ गडावर सुभाष मरकड आणि माजी सरपंच सुधाकर मरकड यांनी पेढेतुला करून प्रत्येक पायरीवर नारळ फोडून खा.लंकेंच्या विजयाची नवसपुर्ती केली. तिसगाव रोडवरील दत्त आश्रमातही महामुनिमजी पोपट महाराज,डॉ जगन्नाथ मरकड यांनी खासदार लंके यांचे जोरदार स्वागत केले. खासदार लंके यांनीही महामुनिमजी पोपट महाराज यांचा सन्मान केला.आणि दत्त दर्शन घेऊन महाराजांचे आशिर्वाद घेतले. महाराजांच्या शिष्यांनीही दत्त मंदिरात होमहवन पुजापाठ करीत जल्लोष केला. श्री क्षेत्र हनुमान टाकळीतील हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश अप्पा महाराज व युवा कार्यकर्ते बंडू बर्डे यांनीही खासदारांना सन्मानित केले. तसेच गावातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी गावात स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका, आणि व्यायाम शाळेसाठी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी खासदारांना लेखी निवेदन दिले.त्या निवेदनावर वैभव काजळे, अविनाश बावणे, अनिकेत म्हस्के, गौतम डमाळ,प्रसाद बावणे, विनोद काजळे यांच्या सह्या आहेत. तर वसंतराव बर्डे, मुकुंद गायकवाड यांनी अपंगांना सवलत मिळावी म्हणून निवेदन दिले आहे. राष्ट्रवादीच्या तुतारी गटाचे नेते आणि कोपरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेशराव आव्हाड, उपसरपंच नारायण वाघमोडे, रामकिसन आंधळे, आदिनाथ पांढरे यांनीही कोपरे गावाच्या वतीने खासदार लंकेंचा सन्मान केला.कासार पिंपळगाव येथेही मुरलीधर भगत,विनायक भगत,शिवाजी भगत, विलास भगत,दादासाहेब भगत यांनी खासदार लंकेंचा सन्मान केला.त्याचवेळी खासदार लंके यांनी नुकतेच निधन झालेले स्व.शाहुराव जगताप यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सान्त्वन केले.खासदार निलेश लंके यांच्या समवेत केदारेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन प्रतापराव ढाकणे, राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, बंडू बोरुडे,देविदास मरकड, अण्णासाहेब मरकड, शिवसेनेचे रफिक शेख,बाळासाहेब ताठे, सतिश पालवे, अशोक मरकड, बालाशेठ मरकड उपस्थित होते. “जिकडे जाईल तिकडे गाडी जाणार गं, लंकेंच्या भेटीसाठी गर्दीच गर्दी राहणार गं, लई नव नव वाटतं, आता गावामंदी, दिल्लीला जाण्याआधी … या मतदाराला लंकेजी भेटून जा” असा आवाज संपूर्ण अहमदनगर दक्षिणेत आता सर्वत्र घुमू लागला आहे.