देवणी येथे शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले

देवणी येथे शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले

====================

शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष आनंद जीवने यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामध्ये सर्वच पक्षांनी शेतकरी संघटनेला पाठिंबा देऊन शेतकरी संघटनेच्या आंदोलना सोबत खांद्याला खांदा लावून सहभाग नोंदविला.

आंदोलन मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विविध पक्षांच्या मान्यवरांचे मनोगत व्यक्त करण्यात आले

शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आले त्या निवेदनात पिक कर्जाचा व्याज परतावा मिळावा, पिक विमा, अनुदान लागु करुन शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावे , दिवसा 8 तास लाईट मिळावे. अनधिकृत पणे पिक कर्ज वसुली च्या नावा खाली पिक कर्जदाराचे बॅक खाते होल्ड केले आहे.त्याची चौकशी करून बँक अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी हे मागण्या मान्य नाही झाल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

या आंदोलनास सुरेंद्र आंबुलगे , मिथुन दिवे सर, गजानन ऊजळबे विकास नमनगे, मेळकुंदे मामा,भंडे दत्ता अर्जुने व अरविंद जी भातंबरे सर अमर अण्णा मुर्के अजित बेळकोने सोमनाथ लूले देविदास पतंगे शरण लुले अरुण पाटील औदुंबर पांचाळ माधवराव जी बिरादार श्रीमंतांना लुले योगेश जी तगरखेडे चेतनजी मिटकरी मल्लिकार्जुन ईश्वरशेटे इब्राहिम तांबोळी करीम भाई शेख व तांबोळी परिवार खुरेशी चंद्रकांत माने पाटील पांडुरंग जी कदम साहेब कल्याण भाऊ धनुरे रमेश जी कोतवाल कोयले सर लक्ष्मण रणदिवे गिरधर जी गायकवाड साबणे सर सिद्राम डोंगरे बालाजी पाटील कालिदास बंडे किशोर जी पाटील पाटील पाटील विळेगावकर संजय जी अंबुलगेअजम भाई उंटवाले असे अनेक शेतकरी देवणी शहर व तालुक्यातून या रास्ता रोको आंदोलनात उपस्थित होते