पाचोराऱ्यातील अवैध्य धंद्यांबाबत भाजपा आक्रमक

पाचोराऱ्यातील अवैध्य धंद्यांबाबत भाजपा आक्रमक

—————————————————-

पोलीस निरीक्षकांच्या आशीर्वादाने काळे धंदे सुसाट – अमोल शिंदे

————————————————–

 

पाचोरा-

 

येथील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन अवैध्य धंद्यांबाबत आवाज उठवला गेला असुन पाचोरा शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध्यरित्या बनावट दारु विक्री, सट्टा, पत्ता व चकरी असे एक ना अनेक चुकीचे उद्योग पोलीस निरीक्षकांच्या आशीर्वादाने सुसाट सुरु आहेत. या संदर्भात भाजपाचे विधानसभा निवडणुक प्रमुख अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी एमसीव्ही महेश्वर रेड्डी पोलीस अधिक्षक जळगांव व धनंजय येरुळे पोलीस उपअधिक्षक पाचोरा विभाग यांना निवेदन दिले आहे.

सदर विषयासंदर्भात भाजपा पदाधिकाऱ्यांनी पाचोरा पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना विचारणा केली असता त्यांनी उर्मटपणे भाजपा पदाधिकाऱ्यांना शिवराळ भाषा वापरुण मला वरीष्ठांना हफ्ते द्यावे लागतात. त्यामुळे मी कुणाच्या बापाला घाबरत नाही तुम्हाला काय करायचे ते करा अशा पध्दीतीने बेताल वक्तव्य करत एक प्रकारे अवैध्य धंद्यांना खत-पाणी घातले आहे.

पाचोरा शहर व ग्रामीण भागात सुरु असणाऱ्या अवैध्य धंद्यांना पोलीस प्रशासनाचा वचक असला पाहिजे परंतु येथे पोलीस निरीक्षकच जर अशा पध्दतीने वक्तव्य करुण त्याला खत पाणी घालत असतील व सदर अवैध्य धंदे त्यांच्या आशीर्वादाने चालत असतील तर याबाबतीत आम्ही ऐकुण घेणार नाहीत. आज सट्टा व पत्यांच्या नांदाला लागुन अनधिकृत रित्या विकल्या जाणाऱ्या बनावट दारुमुळे बऱ्यांच माता – भगीनींचे संसार उध्वस्त् झालेत व पाचोरा तालुक्यातील तरुण हा चुकीच्या मार्गाने जात आहे. व असंख्य व्यसानाच्या विळख्यात अडकला आहे.

यामुळे पाचोऱ्यासारख्या सुसंस्कृत तालुक्याचे नाव खराब होत आहे. यासाठी येथील पोलीस प्रशासन व स्थानिक पोलीस अधिकारी हे सर्वस्वी जबाबदार आहेत यांनी स्वत:च्या आर्थिक स्वार्थासाठी व हफ्त्यांसाठी येथील माता-भगीनींच्या संसाराचा आणि नागरीकांच्या व तरुणांच्या जिवाशी खेळ लावला आहे. परंतु हे कदापी सहन केले जाणार नाही. त्यामुळे पाचोरा तालुक्यातील अवैध्य धंदे तात्काळ बंद करुण सदर बेजाजबदार व उर्मट पोलीस निरीक्षकावर कडक कारवाई करावी. यासाठी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन दिले आहे. व यासंदर्भात योग्य ती कारवाई न-झाल्यास पाचोरा पोलीस स्टेशन समोर भाजपा पदाधिकारी धरणे आंदोलन करतील. असे अमोल शिंदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत म्हटले आहे.

याप्रसंगी निवेदन देतांना भाजपा शहराध्यक्ष दिपक माने, सरचिटणीस समाधान मुळे, जगदीश पाटील तालुका उपाध्यक्ष विरेंद्र चौधरी , टिपु देशमुख ,सहीद शेख, योगेश ठाकुर, लकी पाटील, रोहन मिश्रा, विशाल सोनवणे, प्रदिप पाटील, लक्ष्मण शिंदे, अमोल नाथ, आदी पदाधिकारी उपस्थित होते.