माहिती अधिकार फेडरेशन पाचोरा तालुका प्रचार प्रमुख पदी पत्रकार प्रमोद बारी यांची निवड

माहिती अधिकार फेडरेशन पाचोरा तालुका प्रचार प्रमुख पदी पत्रकार प्रमोद बारी यांची निवड

 

 

पाचोरा ( प्रतिनिधी )

पाचोरा : पाचोरा तालुका : माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघाच्या पाचोरा तालुका प्रचार प्रमुख पदी पाचोरा येथील जनलक्ष्य न्यूजचे संपादक प्रमोद बारी यांची प्रचार प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे राज्य स्तरावर कार्यरत असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या वतीने प्रमोद बारी यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र पाचोरा भडगाव विधानक्षेत्र प्रमुख अध्यक्ष संजय मोरे (सरकार) व तालुका मुख्य संघटक निलेश पाटील यांच्या वतीने मिळाले आहे त्यात भारतीय संविधान व भारतीय कायदे व संघटनेची आचारसंहिता पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या असून सदरील पद नियुक्ती ही तीन वर्षासाठी असून मानद स्वरूपाची असल्याचे संघटनेने कळवले आहे या निवड बद्दल जनलक्ष्य संपादक प्रमोद बारी यांचावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.