पाचोरा कन्या विद्यालयात मुलींचे जल्लोषात स्वागत

पाचोरा कन्या विद्यालयात मुलींचे जल्लोषात स्वागत

 

पाचोरा (प्रतिनिधी)- येथील श्रीमंत विश्वासराव पवार ट्रस्ट, संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयात आज दिनांक 15 जून 2024 रोजी शैक्षणिक वर्ष 24 -25 ची जल्लोषात सुरुवात झाली.

 

याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार, पर्यवेक्षिका श्रीमती उज्वला देशमुख यांनी विद्यार्थिनींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. तर उपस्थित सर्व विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तके देण्यात आली.

 

शैक्षणिक परिपाठ व दैनंदिन प्रार्थना सत्राने शाळेची सुरुवात झाली. शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिनी शाळेत उपस्थित झालेले सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत राजगिरा लाडू देण्यात आला. यापूर्वी झालेल्या एका स्वागत समारंभात प्राचार्य संजय पवार यांनी विद्यार्थिनींना शैक्षणिक वर्ष व शालेय शिस्त तसेच अध्ययन अध्यापन प्रक्रियेबद्दल थोडक्यात माहिती दिली. या स्वागत समारंभाला माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.