मराठा आरक्षणाचा विषय आ पाटील यांनी गांभीर्याने घ्या : मराठा क्रांती मोर्चा
पाचोरा (प्रतिनिधी) – लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळाले म्हणून शिवसेना आयोजित आभार मेळाव्यात मराठा आरक्षण ला पिल्लू म्हटल्याने मराठा क्रांती मोर्चा ने या वक्तव्याचा निषेध केला आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुती ला यश मिळाले म्हणून आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात आपल्या भाषणात आ. किशोरअप्पा पाटील यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांचा कपाशीचा मुद्दा हा पिल्लू म्हणून वापरला जाईल असे बोलल्याचे एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. यावरुन मराठा आरक्षण बाबत सत्तेत सहभागी असलेल्या आ. किशोर पाटील यांच्या सह महायुती ची भुमिका आणि गांभीर्य लक्षात येते. मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी यांनी यांनी या वक्तव्याचा निषेध केला असून आ. पाटील यांनी तात्काळ मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे आणि आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चा च्या माध्यमातून तब्बल ५२ मोर्चे काढण्यात आले होते तर मराठा बांधवांनी जवळपास १०० अधिकांनी आत्महत्या केली आहे. मराठा समाजाला कोणीही येवुन भावना दुखवु नका असे आवाहन श्री सोमवंशी यांनी करुन आ पाटील यांनी तात्काळ मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे अशी शेवटी मागणी केली आहे