पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक अनिल महाजन यांचे बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी धडाकेबाज कार्य.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड च्या प्राधिकृत अधिकारी आमदार. बाबासाहेब पाटील व व्यस्थापकीय संचालक (भा.प्र.से.) सुधाकर तेलंग यांच्या सोबत प्रशासक अनिल महाजन यांची बैठक आज मुबंई मशीद बंदर येथील मुख्य कार्यालयात संपन्न.
पाचोरा बाजार समितीमध्ये महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग लिमिटेड या महामंडळाला खत ठेवण्यासाठी पाचोरा बाजार समितीने ९९ वर्षाच्या करारावर मार्केटमधील मोठे गोडाऊन भाडेतत्वावर दिले आहे. त्याची नूतनीकरण मुदत संपली आहे आणि ते गोडाऊन सध्या बंद आहे.त्याबाबत पाचोरा बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप भाऊ वाघ यांच्या सहीने , एड.शांतीलाल सैंदाणे व बाजार समिती तर्फे यांनी सदर गोडाऊनचा करार वाढून देणेबाबत व भाडेवाढ करणे बाबत यांच्या कार्यलयाला नोटीस पाठवली होती. त्या अनुषंगाने मार्केटच्या उत्पन्न वाढीच्या हितासाठी अनिल भाऊ महाजन यांनी काहीही अवलंबन करता आज वरील अधिकाऱ्यांची भेट घेतली.यांना विनंती केली संबंधित अधिकारी यांनी अनिल महाजन यांच्या विनंतीला मान देऊन बैठकीत सांगितले की *आम्ही या गोडाउनचा करार वाढवून देतो आणि वाढीव भाडेवाढ करून देतो असे सांगितले व सदर गोडाऊन रिपेरिंग करून लवकर सुरू करण्यात येईल असे सांगितले अतिशय पॉझिटिव्ह बैठक संपन्न झाली*.यावेळी अनिल महाजन यांनी यावेळी यांना फ्रेश निवेदन ही दिले त्या निवेदन वर IAS अधिकारी सुधाकर तेलंग यांनि सबंधित अधिकार्यांना तात्काळ फाईल पूटअप करणे बाबत रिमार्क केला