श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

 

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे एसएससी मार्च 2024 मध्ये झालेल्या शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. भाऊसो.श्री.दिलीप वाघ, चेअरमन मा.नानासो.श्री संजय वाघ, व्हाईस चेअरमन मा. नानासो.श्री.व्ही.टी.जोशी, शालेय समिती चेअरमन मा.दादासो. श्री.खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन मा.आण्णासाहेब श्री. वासुदेव महाजन, कुऱ्हाड हायस्कूल चे चेअरमन मा.आप्पासो.श्री.सतीश चौधरी, संस्थेचे संचालक दादासो.श्री.योगेश माधवराव पाटील,आण्णासाहेब श्री. मधुकर सांडू पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

एसएससी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांचा वरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तसेच शाळेतील उपशिक्षिका श्रीमती वनिता जगताप मॅडम यांचा चिरंजीव चिन्मय जगताप याने नीट परीक्षेत 643 गुण प्राप्त केल्याबद्दल त्याचा सुद्धा वरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शालेय समिती चेअरमन दादासाहेब श्री.खलील देशमुख यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने कौतुक केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. संस्थेचे मानद सचिव मा.दादासो ऍड.श्री.महेश देशमुख यांनी सुद्धा दूरध्वनीवरून वरील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

शाळेचे पर्यवेक्षक श्री. आर.एल. पाटील सर यांची पाचोरा तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष भाऊसो श्री. दिलीपजी वाघ व कलाशिक्षक श्री. सुबोध कांतायन सर यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन नानासाहेब श्री.संजयजी वाघ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. एन. आर.ठाकरे सर, पर्यवेक्षक श्री. ए.बी.अहिरे सर, तांत्रिक विभाग प्रमुख श्री.एस.एन.पाटील सर, इयत्ता दहावीचे सर्व वर्गशिक्षक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बी.एस. पाटील सर व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.आर.बी.तडवी सर यांनी केले.