कु. शुश्रुता पाटील हिची वैद्यकीय प्रवेश परीक्षेत विशेष गुणवत्ता सिद्ध 

कु. शुश्रुता पाटील हिची वैद्यकीय प्रवेश परीक्षेत विशेष गुणवत्ता सिद्ध

 

पाचोरा –

गोराडखेडा ता. पाचोरा येथील रहिवासी डॉ. विशाल एस. पाटील यांची भाची कु. शुश्रुता पाटील हिने अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेत 720 पैकी 701 गुणांक प्राप्त करून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या घवघवीत गुणवत्तेच्या बळावर ती NEET 2024 प्रवेशाला पात्र ठरली आहे.

 

गोराडखेडा ता. पाचोरा येथील शिवाजीराव पाटील व सौ. शशिकला पाटील यांची सुकन्या डॉ. सौ. श्वेता पाटील व डॉ .प्रवीण प्रभाकर पाटील, हल्ली मुक्काम म्हारळ, (कल्याण) यांची ती सुकन्या आहे. कुटुंबातील शिक्षणाबद्दलचे समृद्ध वातावरण, मामा -मामी , आजी- आजोबा व आई-बाबांच्या प्रेरणेने आपण हे उच्चांकी गुणांक प्राप्त करू शकलो, अशा प्रतिक्रिया कु. शुशृता पाटील हिने दिल्या आहेत.

कुमारी शुश्रुता पाटील हिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.