माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात गोपीचंद पुना पाटील,विद्यालय,कोळगाव तृतियस्थानी…!!!

माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात गोपीचंद पुना पाटील,विद्यालय,कोळगाव तृतियस्थानी…!!!

 

कोळगाव (भडगाव) – कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा अभियान २०२३-२४ अंतर्गत कोळगाव विद्यालयाचा तृतीय क्रमांक

२०२३-२४, शैक्षणिक वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, व मा उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस साहेब,शालेय शिक्षण मंत्री, दीपक केसरकर, यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या अभियानात जळगाव जिल्ह्यात दोन्ही विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने, भडगाव गटशिक्षणाधिकारी मा. गणेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून अतिशय पारदर्शक पद्धतीने, सदर अभियान राबविण्यात आले. सदर अभियानाचा नुकताच निकाल व बक्षीस वितरण कार्यक्रम मा गटशिक्षणाधिकारी गणेश पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सदर अभियानात गो.पू.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोळगाव, ता.भडगाव, विद्यालयाचा भडगाव तालुका स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला असून आज रोजी मा. साहेबांच्या हस्ते प्राचार्य, श्री. सुनील पाटील यांनी प्रमाणपत्र, ट्रॉफी व शाल सह पुरस्कार स्वीकारला. प्रसंगी निंबा परदेशी सर, माने सर, गट्साधन केंद्र भडगाव येथील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

सदर अभियानात विद्यालयाने तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल आदरणीय, नानासाहेब. प्रतापराव हरी पाटील ,संस्थेचे चेअरमन तसेच संचालक, जे. डी. सी. सी. बँक जळगाव, डॉ.सौ.पूनमताई प्रशांतराव पाटील, संस्थेच्या व्हाॅ. चेअरमन तसेच, संचालिका, जिल्हा दुध उत्पादक संघ जळगाव, दादासाहेब.श्री प्रशांतराव पाटील, संस्थेचे सचिव तसेच उपसचिव ग्रामविकास मंत्रालय महाराष्ट्र शासन यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.