रविवारी पाचोऱ्यात शिवसेना- युवासेना, महिला आघाडी वअंगीकृत संघटनेचा आभार मेळावा

रविवारी पाचोऱ्यात शिवसेना- युवासेना, महिला आघाडी वअंगीकृत संघटनेचा आभार मेळावा

पाचोरा (वार्ताहर) दि ८
लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभेत शिवसेना-भाजपा राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुतीच्या उमेदवार श्रीमती स्मिता वाघ यांना भडगाव- पाचोरा विधानसभा मतदारसंघातून मिळालेल्या विजयाचे शिलेदार असलेल्या सर्व शिलेदारांचे आभार मानण्यासाठी व आगामी विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी आ.किशोर अप्पा पाटील यांचे वतीने रविवारी सकाळी १० वाजता सारोळा रोड वरील समर्थ लान्स येथे जाहीर आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला शिवसेना युवासेना, महिला आघाडी, उपजिल्हा प्रमुख, समन्वयक, संघटक तालुका प्रमुख, समन्वयक, संघटक विधानसभा क्षेत्र प्रमुख उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, गण प्रमुख, उप गण प्रमुख तसेच नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष व नगरसेवक न.पा.पाचोरा-भडगाव. सभापती, उपसभापती व संचालक मंडळ कृ.ऊ. बाजार समिती,
पाचोरा भडगाव. चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळ शेतकी संघ, पाचोरा भडगाव व शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख बूथ प्रमुख व
प्रमुख पदाधिकारी व शिवसेना अंगीकृत संघटना यांना मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन
शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर यांनी केले असून मेळाव्याला आ. किशोर आप्पा पाटील हे मार्गदर्शन करणार असून यावेळी
जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील,युवा सेनेच्या उत्तरे महाराट्राच्या विस्तारक डॉ प्रियांका पाटील, युवानेता सुमीत पाटील, सुनिताताई किशोर पाटील,महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख,भडगाव डॉ विशाल पाटील,तालुका प्रमुख सुनील पाटील,युवासेना जिल्हा प्रमुख। जितेंद्र जैन,धर्मा भाऊ भिल जिल्हा प्रमुख एकलव्य शिवसेना,गणेश पाटील सभापती, कृ.उ.बा.समिती पाचोरा-भडगाव,संजय पाटील (तालुका प्रमुख, पाचोरा) श्री. सुमित सावंत ( शिवसेना शहर प्रमुख, पाचोरा)श्री. योगेश पाटील (उपजिल्हा प्रमुख, युवासेना पाचोरा )सौ. मंदाताई पाटील
(ता. प्रमुख महिला आघाडी, पाचोरा)श्री. अजय चौधरी( शिवसेना शहर प्रमुख, भडगाव)
श्री. दुर्गेश वाघ (उपजिल्हा प्रमुख, युवासेना भडगाव) प्रकाश पाटील उपसभापती, कृ.ऊ.बा.समिती पाचोरा-भडगाव रत्ना पाटील ,ता. प्रमुख महिला आघाडी, भडगाव) भोला पाटील (शहर प्रमुख, पाचोरा) अनिल पाटील (ता.प्रमुख, युवासेना, पाचोरा) योगेश गंजे (शहर प्रमुख, भडगाव) रवि पाटील (ता.प्रमुख, युवासेना, भडगाव) यांची उपस्थिती लाभणार आहे.