पाचोरा पोलीस ठाणे तर्फे जाहीर आवाहन

‼️‼️ पाचोरा पोलीस ठाणे तर्फे जाहीर आवाहन…‼️‼️

 

पाचोरा पोलीस स्टेशन जिल्हा जळगाव हद्दीतील सुजाण नागरिकांना याद्वारे जाहीर आव्हान करण्यात येते की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दिनांक 16/3/2024 पासून ते दिनांक 6/6/2024 पावेतो आदर्श आचारसंहिता अंमलात असून जळगावसह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निकाल मंगळवारी दिनांक 4/6/2024 रोजी जाहीर होणार असून त्याअनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमांद्वारे करू नयेत. तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये. डीजे वाजवणार नाहीत. फटाके फोडणार नाहीत. तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये. व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी दिनांक 3/6/2024 ते दिनांक 6/6/2024 या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये Only admin करून बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाहीत. जर एडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह सर्व ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून त्यांचेविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

 

अशोक कचरू पवार पोलीस निरीक्षक पाचोरा पोलीस स्टेशन