पाचोरा विभागाचे डी वाय एस पी श्री धनंजय येरुळे साहेब यांनी नवीन आलेल्या कायद्यासंदर्भात पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना माहिती व मार्गदर्शन करताना
पाचोरा, प्रतिनिधी
(अनिल आबा येवले) सध्या भारतात कायद्यामध्ये बरीच सुधारला व बदल होत असून त्यातील काही अडचणी दूर करून नवीन दुरुस्ती करण्यात आली असून कायद्यातील पोलिसांवर व अधिकारी यांच्यावर येणाऱ्या अडचणीवर सहकार्य करण्यासाठी कायद्यातील काही बदल करण्यात आलेले असून संपूर्ण भारतात पोलीस खात्या अंतर्गत त्या त्या विभागाचे अधिकारामार्फत पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना नवीन सुधारणा झालेल्या कायद्याबद्दल पाचोरा विभागाचे डी. वाय. एस. पी. श्री धनंजय येरुळे साहेब यांनी माहिती व मार्गदर्शन दिले यावेळी पाचोरा जामनेर पहुर शेंदुर्णी या भागातील सर्व अधिकारी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब व आभार जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री किरण शिंदे साहेब यांनी केले यावेळी 12 पोलीस अधिकारी व १०७ पोलीस कर्मचारी उपस्थित होते..