पाचोरा प्रा.राजेंद्र चिंचोले सरांचा सेवापूर्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न

पाचोरा प्रा.राजेंद्र चिंचोले सरांचा सेवापूर्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न

आज दिनांक 2 जून 2024 रोजी ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्र पाचोरा च्या माजी विद्यार्थ्यांनी स्वप्नशिल्प रेसिडेन्सी , भडगाव रोड , पाचोरा येथे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक राजेंद्र चिंचोले यांचा सेवापूर्ती व कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. मंचावर सत्कारमूर्ती प्रा. राजेंद्र चिंचोले यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री प्रमिला चिंचोले , धर्मपत्नी सौ.सविता चिंचोले उपस्थित होते. सुरुवातीला सरस्वती पूजन करण्यात आले. नंतर सर्व शिष्यांच्या वतीने प्रा.चिंचोले यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यानंतर चिंचोले सरांची प्रकट व अभिनव मुलाखत श्री.सुनील वाणी( सचिव विधानसभा अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य) यांनी घेतली.त्यांनी विविध प्रकारे प्रश्न विचारत चिंचोले सरांना बोलतं केलं व अशा पद्धतीने प्राध्यापक चिंचोले सरांनी त्यांचा जीवन प्रवास उलगडला.