गुरुकुलची विद्यार्थिनी पाचोरा तालुक्यातून सर्व प्रथम

गुरुकुलची विद्यार्थिनी पाचोरा तालुक्यातून सर्व प्रथम

पाचोरा येथील गुरुकुल स्कुलची गगन भरारी

 

१००% निकालासह तालुक्यात सर्वप्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान

नुकताच एस.एस.सी व एच एस सी. परीक्षांचा निकाल जाहीर झाला. त्यात पाचोरा शहरातील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल या शाळेने दोन्ही परीक्षेत १०० % निकालाची परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत भरीव यश संपादन केले.

विशेष म्हणजे पाचोरा तालुक्यातील सर्व सीबीएससी , राज्य मंडळाच्या सर्व इंग्रजी माध्यम , मराठी माध्यम, सेमी शाळेतील १० वी च्या परीक्षेत बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये गुरुकुल ची विद्यार्थिनी अदिती संतोष अलहीत (वाणी ) हिने ९८.२०% टक्के मिळवून तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच

२ रा क्रमांक , दिक्षा दिगंबर माळी ( ९५.४०)

३ रा क्र. योगिनी विजय पाटील ( ९५.२०)

४ था चिराग रेलुमल वासवानी ( ९३.८०)

५ वा क्र. साक्षी परमानंद शामनाणी ( ९३.२०%) घेऊन विशेष प्राविण्य

मिळविले आहे.

इ.१० वी व १२ वी मध्ये गुरुकुल चे सर्व चे सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत व अदिती ने तालुक्यातून सर्व प्रथम यश संपादन केल्यामुळे विद्यार्थी , शालेय व्यवस्थापन व मेहनती शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.