हजला जाऊन मतदारसंघाच्या विकासासह शांती अमनसाठी दुवा मागावी-आ.”किशोर अप्पा पाटील यांची भावनिक साद

हजला जाऊन मतदारसंघाच्या विकासासह शांती अमनसाठी दुवा मागावी- हजसाठी जाणाऱ्या हाजींचा सत्कार सोहळ्यात आ.”किशोर अप्पा पाटील यांची भावनिक साद

पाचोरा(वार्ताहर) दि,२५

मुसलीम धर्मात दिलेल्या सामाजिक कर्तव्याचा भाग असलेली हज यात्रा ही अल्लाहाच्या हाकेला दिलेली साद असून अनेक भाविक दरवर्षी हजयात्रेसाठी जात असतात त्यांच्या सत्कारासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी देखील तेवढाच उत्सुक असतो तसेच जाणाऱ्या सर्व हाजींनी

मतदारसंघाच्या विकासासह संपूर्ण मानव जातीच्या शांती अमनसाठी अल्लाहकडे दुवा मागावी अशी भावनिक साद आ.किशोर अप्पा पाटिल यांनी दिली. पाचोरा व भडगाव तालुक्यातून पवित्र हज साठी जाणाऱ्या हजींच्या सत्काराच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.पाचोरा शहरातील आठवडे बाजारातील नूर मस्जिद येथे गुरुवारी संध्याकाळी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात करण्यात आले होते.

यावेळी मंचावर वहाब बागवान,माजी नगरसेवक बंडू चौधरी,रहेमान तडवी,नूर मस्जिदचे खतीबो-इमाम मौलाना जीशान रजा साहेब, शिक्षक सेना जिल्हा संघटक विजय ठाकूर,केंद्रप्रमुख कदीर शब्बीर,सामाजिक कार्यकर्ते प्रवीण ब्राह्मणे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, मुसलीम धर्मात जसे हज यात्रेला महत्व आहे तसेच हिंदू धर्मात देखील चारधाम यात्रेला महत्व असून शेवटी सर्वच धर्मगुरूंनी, महापुरुषांनी मानव जातीच्या कल्याणासाठी काम केलेले असून आपले कुटुंब देखील गेल्या दोनशे वर्षांपासून विठ्ठलाच्या भक्तीत रममान होणारे असल्याचे त्यांनी सांगितले.शांतता व परस्परातील धार्मिक सामाजिक सलोख्यामुळे मतदारसंघाचा विकास करणे आपल्याला शक्य होत असल्याचे मतही त्यांनी मांडले.तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल शेख जावेद रहीम यांचेसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रतावीक शेख जावेद रहीम यांनी मांडली. नंतर नूर मस्जिदचे खतीबो-इमाम मौलाना जीशान रजा साहेब, शिक्षक सेना जिल्हा संघटक विजय ठाकूर,केंद्रप्रमुख कदीर शब्बीर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी नूर मस्जितचे खतिबो-इमाम जिशान रजा साहेब, अध्यक्ष महमूद खान साहेब, वहाब बागवान,जहांगीर पिंजारी, जाकीर खाटीक,उस्मान खाटीक,जॅकी खाटीक,फारुख पिंजारी, नवीद देशमुख,शरीफ रंगरेज, सलीम मनयार यांचेसह आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक ,सूत्रसंचालन व आभार शेख जावेद रहिम यांनी केले. कार्यक्रमाला नगरदेवळा,नालबंदी,भोकरी,शेंदुर्णी, पाचोरा ,भडगाव येथील हजींची मोठी उपस्थिती होती.