श्रीरामसिता शिक्षण प्रसारक मंडळ कासमपुरा, संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासमपुरा शाळेने यशाची परंपरा कायम

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

श्रीरामसिता शिक्षण प्रसारक मंडळ कासमपुरा, संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासमपुरा ता. पाचोरा. जि. जळगाव शाळेने यशाची परंपरा कायम

 

 

 

श्रीरामसिता शिक्षण प्रसारक मंडळ कासमपुरा, संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासमपुरा ता. पाचोरा. जि. जळगाव शाळेने यशाची परंपरा कायम ठेवत इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा निकाल 100 % तर कला शाखेचा निकाल 93.83 % लागला. विज्ञान शाखेतून कुमारी खेडेकर हेमांशी देवेंद्र व कुमारी पाटील समीक्षा सुभाष या दोघींनी 89 % गुण मिळवून संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक पटकावला. पाटील स्वामीराज मिलिंद याने 87 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. कुमारी घोंगडे सृष्टी जितेंद्र व पिंजारी सादिया शकील यांनी 87.83% गुण मिळवून संयुक्तरित्या तृतीय क्रमांक मिळविला . तर कला शाखेत कुमारी उबाळे योगिता मोहन हिने 81.83% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक 76 % गुण मिळून रूम शाम आनंदा उत्तीर्ण झाला. 74 .83 % गुण मिळवून कुमारी तायडे चांदणी भास्कर ही तृतीय क्रमंकाने उत्तीर्ण झाली . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन भाऊसो श्री.योगराज राजपूत, संस्थेच्या सचिव ताईसो सौ.मेघाताई राजपूत, संस्थेच्या संचालिका ताईसो सौ.शीतलताई राजपूत, संस्थेचे सर्व संचालक शाळेचे मुख्याध्यापक श्री.किरण चौधरी सर, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कासमपुरा ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.