चोपडा महाविद्यालयात पेटंट प्राप्त गुणवंत प्राध्यापकांचा सत्कार
चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील पेटंट प्राप्त संगणक विभागाच्या सहा.प्रा.सौ.आरती पाटील व व्यवस्थापन विभागाच्या सहा.प्रा.सौ.आर.पी.जैस्वाल यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांना भारत सरकारतर्फे मिळालेल्या पेटंट बद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील तसेच महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, रजिस्ट्रार श्री.डी.एम.पाटील व व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. ए. एच. साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. सहा.प्रा.सौ.आरती पाटील व सहा.प्रा.सौ.आर.पी.जैस्वाल यांना भारत सरकारच्या पेटंट कार्यालयातर्फे ‘Lexical Analysis Compiler Device’ या संदर्भात डिझाईन निर्मिती केल्यामुळे पेटंट प्राप्त झाले आहे तसेच सहा.प्रा.सौ.आरती पाटील यांचे Digital World या पुस्तकासाठी Method to Improved Blockchain Security अंतर्गत Scopus indexed ISI THOMSON Reauters या Journal of Electrical System या नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचे डिझाईन व संशोधन प्रकाशित झाले आहे.
त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड .संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी, उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे, समन्वयक डॉ.एस.ए. वाघ व रजिस्ट्रार श्री.डी.एम. पाटील त्याचप्रमाणे महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.