वेळ संपला तरीही जवखेडे खालसा येथे पावणेसात पर्यंत मतदारांच्या मतदानासाठी रांगा!
(सुनिल नजन”चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हा) लोकसभेच्या निवडणूकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान तेरा तारखेला पार पडले. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे मतदान केंद्रावर मतदानाची वेळ ही सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत होती. परंतु सायंकाळचे पावणेसात वाजले तरीही जवखेडे खालसा येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या मतदाना साठी लांब रांगा लागलेल्या होत्या.या गावचे एकूण मतदान २३६५ होते. त्यापैकी १५८६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क चोख बजावला. पण दुपार नंतर मतदानाचा वेग वाढला होता. जवखेडे गावचे लोकनियुक्त सरपंच चारुदत्त वाघ हे सर्व बाबीवर विषेश लक्ष ठेउन होते. अमोल वाघ,सुरेश वाघ,अमोल गवळी, संजय मतकर यांनी आपला मतदानाचा हक्क चोख बजावला. परंतु प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील जाहीर प्रचारसभेत मुस्लिम समुदायाला उदेशून विरोध दर्शवित केलेल्या भाषणाचा परिणाम थेट मतदान केंद्रावर पहावयास मिळाला.मुस्लिम समुदायाने भाजपच्या उमेदवारांना विरोध दर्शवित भाजपच्या विरोधात भुमिका घेतल्याचे दिसून आले.त्यांनी तुतारी वाजवत प्रधानमंत्री मोदींनी केलेल्या भाषणावर आपला राग व्यक्त केला आहे. हेच चित्र संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात पहावयास मिळाले.”करायला गेले गणपती आणि झाला मारुती”अशीच अवस्था राज्यातील संपूर्ण मतदार संघात पहावयास मिळाली.अहमदनगर जिल्ह्यात भाजप महायुतीचे उमेदवार सुजयदादा विखे आणि महाविकास आघाडीचे निलेशजी लंके यांच्या समर्थकात विजयासाठी च्या पैजा पडल्या आहेत.या लक्षवेधी लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.