दलित महिलेवर अत्याचार, शिऊर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल एक फरार व एक तात्पुरता जामीन
दलित महिलेवर अत्याचार, शिऊर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल एक फरार व एक तात्पुरता जामीन… दलित महिलेला न्याय मिळण्यासाठी, त्वरित आरोपींना अटक व्हावी यासाठी ग्रामीण पोलीस आयुक्त यांना दिले निवेदन…. आयुक्त यांनी एलसीबीच्या ताब्यात केस देऊन लवकरच गिरफ्तार करण्याचे दिले आश्वासन….. छत्रपती संभाजी नगर – तुमच्या जमिनीचा व्यवहार करून देतो सर्व कागदपत्र घेऊन या असे सांगून २९ जानेवारी २०२४ च्या दिवशी एका दलित २५ वर्षीय महिलेचा विनयभंग करून मारपीट व जातीवाचक शिविगाळ केल्याने पीडित महिला ने दोन आरोपी १)गणेश बाळू निघुट २) कैलास भगत दोघे राहणार चिकटगाव तालुका वैजापूर च्या विरुद्ध 30 जानेवारी २०२४ रोजी वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलीस ठाण्यात आरोपी गणेश निघुट व आरोपी कैलास भगत दोघेही राहणार चिकटगावच्या विरुद्ध भादवि कलम ३७६,३२३,५०४,५०६,३४, व ॲट्रॉसिटी ३(1)(w)(i) ने गुन्हा दाखल केला गेला .गणेश बाळू निघुट फरार व कैलास भगतला कोर्टाकडून तात्पुरता जामीन मिळाली आहे . पोलिसांनी चारसीट कोर्टात दाखल केली आहे व पीडित महिलाने पोलीस महिला कर्मचारीवर प्रतांडित करण्याचा व मारहाण करण्याचा आरोप लावला याची तक्रार १३मार्च २०२४ ला पोलीस आयुक्त सिटी व ग्रामीण कार्यालयाला देण्यात आले होते.आज या घटनेस अडीच महिने होऊन देखील पीडित महिलेला न्याय मिळालेला नाही. आरोपी अजून देखील फरार आहे. यामुळे पीडित महिलाने श्रीमती राजश्री चौधरी सबला उत्कर्ष वृत्तपत्र दिल्लीच्या मुख्य संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई च्या संपर्क प्रमुख दिल्ली यांना सर्व सत्य घटना सांगितल्याने राजश्री चौधरी यांनी सर्व माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना फोन ने कळवली तर त्यांनी पिडीत महिला च्या मागे खंबीरपणे पाठिंबा दाखवून सामाजिक कार्यकर्ता काजल केदारे यांना पीडित महिलांच्या अत्याचाराची सहनिशा राजश्री चौधरी बरोबर करण्यास सांगीतले . तेव्हा काजल केदारे व राजश्री चौधरी दि. १५ एप्रिल रोजी पोलीस स्टेशन शिऊर व वैजापूर आयुक्त कार्यालय गेले असता त्यांना उडवा उडीचे उत्तर मिळाल्यामुळे आज दि.१८ एप्रिल च्या दिवशी ग्रामीण पोलीस आयुक्त संभाजीनगर यांना राजश्री चौधरी सबला उत्कर्ष वृत्तपत्र संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संपर्कप्रमुख दिल्ली व पीडित महिला व राहुल परदेशी सबला उत्कर्ष वृत्तपत्र रिपोर्टर (औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर) यांनी मिळून आज दिनांक १८ एप्रिल ला निवेदन देऊन आरोपी गणेश बाबू निघुट व कैलास भगतला लवकरात लवकर गिरफ्तार अटक करण्याची विनंती केली .पोलीस आयुक्त यांनी फोनवरून आपल्या टीमशी संभाषण करून या केस बद्दल थोडी माहिती दिली व राजश्री चौधरी व पीडित महिलाला आश्वासन दिले की ही केस आता पोलीस स्टेशनला न जाता छत्रपती संभाजी नगरच्या एलसीबी कडे सोपवण्यात येत आहे व लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असे ही आश्वासन दिले .