नगरदेवळा ग्रामस्थांनी मतदान शपथ सह साजरा केली रमजान ईद
पाचोरा तालुक्यातील सर्वात मोठा गाव असलेला नगरदेवळा गावातील मुस्लिम बांधवांनी अनोख्या रीत्याने म्हणजे मतदान शपथ घेऊन रमजान ईद साजरा केली. भारत सरकार SVEEP कार्यक्रम अंतर्गत मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या तो एक हिस्सा होता.यावेळी ईदची नमाज पठण करण्यासाठी सर्व मुस्लिम बांधव नगरदेवळा ईदगाह येथे जमा झाले. जामा मस्जिद चे इमाम आले मुस्तफा साहेब यांनी ईदची नमाज नंतर मतदान हक्काचे महत्व समजावले. भारताची लोकशाही मजबूत करण्यासाठी व चांगले माणसांना निवडून भारतात पारदर्शिता आणण्यासाठी प्रत्येक मतदातांनी आपले मतदान करावे अशी त्यांनी अपील केली. ईदची नमाज नंतर ग्रामस्थांनी मतदान शपथ घेतली. या वेळी आपल्या भारत देशात शांतता, बांधुत्वता, एकात्मता, अखंडता निर्माण होण्यास तसेच रशिया-युकरेन, इजराइल-फिलिस्तीन युद्ध बंद होऊन आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण व्हावी अशी प्रार्थना करण्यात आली.यावेळी अब्दुल गनी कमरोद्दीन, अन्नू मेंबर, जुबेर खान, मौलाना गुलाम मोहयोद्दिन, अली राजा खा, राहील शेख, रऊफ कमरोद्दिन,हबीब सेठ, साजिद शेख, वसीम गुलाम, वसीम पट्वे,अफरोज शेख, अहतेशाम शेख, सक्रिय बीएलओ शेख जावेद रहीम उपस्थित होते. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद ची शुभेच्छा दिली.