चोपडा महाविद्यालयातील प्रा.डॉ.ए.एल. चौधरी यांची इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

चोपडा महाविद्यालयातील प्रा.डॉ.ए.एल. चौधरी यांची इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील गुणवंत प्राध्यापकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिताताई संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सुर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, उपप्राचार्य एस. पी.पाटील, पर्यवेक्षक ए. एन. बोरसे, समन्वयक पी.एस.पाडवी, डॉ.सौ. पी.एम.रावतोळे व संदीप बी.पाटील आदी उपस्थित होते.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक्स व इन्स्ट्रुमेंटेशन विषयाच्या अभ्यास मंडळावर अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.

इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विभाग प्रमुख तसेच उपप्राचार्य प्रा.डॉ.ए. एल.चौधरी यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेन्शन अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांनी आत्तापर्यंत सिंगापूर व जपान येथे अभ्यास दौरे केले आहेत. त्यांना युजीसीतर्फे ०४ फेलोशिप प्राप्त झाल्या आहेत. त्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ‘बेस्ट टीचर अवार्ड’ तसेच ‘महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार’, ‘नॅशनल बिल्डर्स अवार्ड’ व ‘समाज रत्न पुरस्कार’ प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स व संशोधन विषयक संस्थांचे फेलो, सदस्य व आजीवन सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. विविध अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा, चर्चासत्रे व परिसंवाद, सेमिनार यामध्ये त्यांनी सत्राध्यक्ष, प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थिती दिली आहे. आत्तापर्यंत प्रभारी प्राचार्य, उपप्राचार्य, विभाग, प्रमुख, जनशिक्षण संस्थेचे संचालक, सचिव अशी अनेक प्रशासकीय पदे सांभाळून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी ६० हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय, विद्यापीठस्तरीय कार्यशाळा, परिषदा, चर्चासत्रात सहभाग नोंदविला असून १८ कार्यशाळा, चर्चासत्र व सेमिनारचे त्यांनी आयोजन देखील केले आहे. ०१ मायनर प्रोजेक्ट व ०१ मेजर प्रोजेक्ट पूर्ण केला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत ०१ विद्यार्थी एम.फिल व ०१ विद्यार्थ्याने पीएचडी प्राप्त केली आहे तसेच सध्या ०२ विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी करीत आहेत. त्यांचे आत्तापर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर ४७ हून अधिक संशोधन लेख प्रकाशित झाले असून ४० हून अधिक पुस्तके देखील प्रकाशित झाली आहेत. २७ हून अधिक ठिकाणी त्यांनी अभ्यासपूर्ण व्याख्याने देखील दिली आहेत.

उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी यांची इलेक्ट्रॉनिक्स व इन्स्ट्रुमेंटेशन विषयाच्या अभ्यास मंडळावर अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिताताई संदीप पाटील त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.