सुजयदादा विखेपाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळूनये म्हणून पाण्यात देव बुडवून बसलेल्या विरोधकांना झनझनीत चपराक?
(सुनिल नजन” चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हा) (अहिल्यानगर) अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपच्या कोट्यातून विद्यमान खासदार सुजयदादा विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळूनये म्हणून अनेकांनी आपल्या देव्हाऱ्यातील देव पाण्यात बुडवून ठेवले होते. विरोधकाच्या नाटकाच्या तंबूत दाखल होउन विखे पाटील परिवारावर निष्क्रिय खासदार, मतदारसंघात पाच वर्षांत भाजपच्या सरकारच्या काळात काहीच काम केले नाही असे नको नको ते बिनबुडाचे आरोप करून खासदार सुजयदादा विखे पाटील यांची जनमानसातील प्रतिमा डागाळण्याचा जो एक महिनाभर केविलवाणा प्रयत्न झाला त्या अघोरी प्रयत्नांना केंद्रीय निवड समितीने खासदारांना जाहीर करण्यात आलेल्या तिकीटाच्या यादीत खासदार सुजयदादा विखेपाटील यांचे नाव जाहीर करून विखेंना पुन्हा उमेदवारी देउ नका म्हणणाऱ्यांना एक चांगली झनझनीत चपराक दिली आहे. विरोधकांनी विखे विरोधात बंड पुकारून विरोधाची उघड भूमिका घेऊन जो खालच्या पातळीवर जाऊन विरोध केला तो आता मात्र कायमचाच बंद झालाआहे.ज्यांना साधे जनतेतून आमदार म्हणून निवडून येता नाही आले असे लोक विखे पाटील यांच्या वर सैराटपणे बेताल आरोप करण्यात पटाईत होते. विखेंच तिकीट कापलं आहे.माझे वरपर्यंत वजन आहे अशी वल्गना करणाऱ्यांची आता विखेपाटील यांच्या जाहीर झालेल्या लोकसभेच्या उमेदवारीमुळे चांगलीच पाचावर धारण बसली आहे. “विखेपाटील पॅटर्न ” नेमका काय असतो त्याची फक्त हलकीशी झलक या निमित्ताने विखे विरोधकांना पहिल्यांदाच पहायला मिळाली आहे. तळ्यात का मळ्यात,घड्याळ का तुतारी दोन्ही पक्षांच्या डगरीवर हात ठेवून विरोधी पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी राजकीय निरिक्षकांचे उंबरठे झिजवताना नेमकी कोणाची ससेहोलपट झाली हे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माहीत झाले आहे.आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक काळात कोण कोणते डावपेच आखले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लोकसभेच्या तिकिट वाटपाच्या लढाईत विखेंनी अर्धी लढाई जिंकून बाजी मारलेली आहे.पण निवडणुकीत निवडून येण्यासाठी नेमकेपणाने कोणकोणते डावपेच आखले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विखेयंत्रणा अतिशय सक्रिय झालेली आहे. या निमित्ताने खासदार सुजयदादा विखेपाटील यांचा गल्ली ते दिल्ली येथील बोलबाला राजकारणातल्या नवोदित तरुणाईला आकर्षित करीत आहे. विखेंना निवडून येण्यासाठी अजूनही कोण कोणत्या अवघड परिस्थितीचा सामना करावा लागेल हा येणारा काळच ठरवेल.