श्री.गो.से .हायस्कूल पाचोरा येथे नवभारत साक्षरता अभियानांतर्गत वकृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न
पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथे नवभारत साक्षरता अभियानांतर्गत वकृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धा येथील कलादालन येथे घेण्यात आल्या. यावेळी इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वकृत्व व निबंध स्पर्धेसाठी साक्षरता काळाची गरज, जीवनात साक्षरतेचे महत्व, साक्षर भारत समर्थ भारत, असाक्षरतेमुळे जीवनात येणाऱ्या अडचणी इतक्या दिवसांवर विद्यार्थ्यांनी वकृत्व सादर केले. चित्रकला स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा असाक्षर निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग, आधुनिक तंत्रज्ञानाचा साक्षरतेसाठी उपयोग इत्यादी विषयांवर परीक्षा घेण्यात आल्या. वकृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यावेळी उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहील, ज्येष्ठ शिक्षक प्रीतमसिंग पाटील, रवींद्र बोरसे, रुपेश पाटील,श्रद्धा पवार, सुबोध कांतायन , प्रमोद पाटील, ज्योती पाटील, शितल महाजन गायत्री पाटील, शिक्षकांचा इ.प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम स्पर्धा संपन्न झाल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले