अहिराणी बोलीतील लोकसाहित्य समृद्ध – कवी रमेश धनगर
पाचोरा दि. 29 – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने कविवर्य तात्यासाहेब विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिवसा’निमित्त खानदेशचे अहिराणी कवी प्रा. रमेश धनगर यांचे ‘जागर अहिराणी मायना!’ या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. शिरीष पाटील होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते खानदेशातील अहिराणी कवी प्रा. रमेश धनगर यांनी आपल्या मनोगतातून अहिराणी भाषा कशी प्राचीन आहे याचे दाखले दिले. अहिराणीचे लोकसाहित्य समृद्ध आहे. लगीन सोबन, आखाजी, गवराई, कानबाईची गाणी आणि त्यातला आशय हा आपणास चिंतन करायला भाग पाडतो. या गाण्यातल्या व्यक्तीरेखांचा अभ्यास होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. मराठी भाषा समृद्ध व्हायची असेल तर बोली संवर्धनासाठी आपण पुढे आले पाहिजे. आपल्याला बोलीतूनच आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त करता येतात असे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी अहिराणीच्या काही हास्य कविता त्यांनी सादर केल्या. अध्यक्ष प्राचार्य प्रा. डॉ. शिरीष पाटील यांनी मराठी भाषेला राजभाषा म्हणून मान्यता मिळावी म्हणून अनेक वर्षे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी केले. त्यांनी मराठी संवर्धनासाठीच्या अपेक्षा आणि तिला अभिजात दर्जा मिळवण्यासंदर्भातली आशा व्यक्त केली. यावेळी लोकनेते स्वर्गीय अप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ऑक्टोबर महिन्यात घेतलेल्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. अनुक्रमे प्रथम कु. गायत्री श्रीकृष्ण शिरसागर – प्रथम वर्ष साहित्य, द्वितीय कु. चेतना रणदीप हिरे – प्रथम वर्ष साहित्य, तृतीय कु. धनश्री मधुकर पाटील – तृतीय वर्ष साहित्य तर निबंध स्पर्धेत प्रथम कु. आरती राजेंद्र पाटील – प्रथम वर्ष साहित्य, द्वितीय कु. चांदणी सुदामा कोरी – प्रथम वर्ष साहित्य, तृतीय कु. अदिती जगदीश गरुड – द्वितीय वर्ष साहित्य, उत्तेजनार्थ कु. योगेश्वरी राजेंद्र पाटील – तृतीय वर्ष साहित्य, उत्तेजनार्थ कु. तेजस्विनी शिवाजी निकवाडे – प्रथम वर्ष साहित्य व उत्तेजनार्थ कु. हर्षदा भागवत पाटील – तृतीय वर्ष साहित्य या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक देण्यात आली. यावेळी उपप्राचार्य व हिंदी विभागप्रमुख मा. प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, ग्रंथपाल प्रा. पी. एम. डोंगरे, प्रा. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अतुल पाटील, डॉ. शरद पाटील, डॉ. माणिक पाटील, डॉ. शारदा शिरोळे, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. प्रदीप रुद्रसवाड, प्रा. अमित गायकवाड, प्रा. नितीन पाटील, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. सुवर्णा पाटील, डॉ. सीमा सैंदाणे, प्रा. प्राजक्ता देशमुख, प्रा. सरोज अग्रवाल, प्रा. संजिदा शेख, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. रोहित पवार, प्रा. विशाल पाटील, प्रा. गौतम निकम, प्रा. सुनील पाटील, प्रा. संदीप द्राक्षे, श्री. विजय पाटील, श्री. विजय सोनजे, श्री. उमेश माळी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील भोसले व आभार डॉ. के. एस. इंगळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. वासुदेव वले, प्रा. पी. एम. डोंगरे, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. स्वप्नील भोसले, श्री. विजय पाटील, श्री. विजय सोनजे, श्री. उमेश माळी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.