श्री. गो.से .हायस्कूल पाचोरा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा
पाचोरा ( प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित ,श्री .गो .से. हायस्कूल पाचोरा येथे दिनांक २८ फेब्रुवारी रोजी, भारतीय भौतिक शास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते डॉ .सी .व्ही .रामन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा झाला.
महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष, विज्ञान शिक्षक रवींद्र चौधरी यांनी लोक अंधश्रद्धेला कसे बळी पडतात यासंबंधीचे अनेक लहान लहान प्रयोग करून दाखवले. त्यांच्या स्पष्टीकरणातून त्यांनी भोंदू बाबांच्या ‘चमत्कारा मागील विज्ञान ‘स्पष्ट केले. त्यांनी विविध प्रयोग दाखवून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र बोरसे यांनी केले. पर्यवेक्षिका अंजली गोहिल यांनी प्रास्ताविकातून, विद्यार्थ्यांना जनजागृती चे महत्व समजावले. प्रशाळेचे उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून ‘विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व ‘विशद केले.
कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक प्रीतम सिंग पाटील ,ज्येष्ठ शिक्षिका संगीता पाटील, , वनिता जगताप, सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार रवींद्र जाधव आभार मानले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले