एम. एम. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांची पाचोरा पीपल्स को. बँकेला भेट
पाचोरा दि.14 – पाचोरा येथील नामांकित पाचोरा पीपल्स सहकारी को-ऑपरेटिव्ह बँक लि. पाचोरा येथे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. या भेटीची परवानगी पाचोरा पीपल्स बँकेचे चेअरमन मा. श्री. ॲड. अतुल संघवी व व्हा. चेअरमन सी. ए. मा. श्री. प्रशांत अग्रवाल यांनी दिली. बँकेत भेटी निमित्ताने विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवहाराबाबत बँकिंग व्यवहार प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. बॅंकेत बँक अकाउंट काढण्यापासून ते सेविंग अकाउंट, फिक्स डिपॉझिट, कर्ज योजना, कर्ज देणे, घेण्याच्या पद्धती, बँकिंग एन.ई.एफ.टी., के.वाय.सी., बँकिंग सॉफ्टवेअर तसेच प्रत्यक्ष बँकेचे दैनंदिन काम कशा पद्धतीने चालते. यासंबंधी मा. विनोद संघवी व अधिकारी, कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले. या बँक भेटीसाठी बँकेचे सीईओ श्री. आर. एस. पाटी, श्री. शंकर उसरे, जी. एम. श्री. सुशांत मोरे (कर्ज विभाग), श्री. प्रशांत दहीवेतकर, बँक मॅनेजर श्री. वर्मा, श्री. रवी जोशी व इतर सर्व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागाची माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. वासुदेव वले तसेच उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी वाणिज्य विभागप्रमुख प्रा. योगेश पुरी, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. बी. तडवी प्रा. अक्षय शेंडे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सी. ए. प्रा. सरोज अग्रवाल यांनी केले.
यासाठी महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य लाभले.