घोटण येथे धर्मनाथ बीजकिर्तन महोत्सव व नवनाथ पारायण सोहळ्याची सांगता
(सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील घोटण येथे धर्मनाथ बीजकिर्तन महोत्सव व नवनाथ पारायण सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता झाली.वै.आश्रू गंगाराम निकम यांच्या प्रेरणेने आणि हे.भ.प.रामहरी महाराज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने या किर्तन महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सर्व ह.भ.प.विलास महाराज गेजगे, मच्छिंद्र महाराज निकम, एकनाथ महाराज चत्तर शास्त्री, निलेश महाराज कोरडे, पांडुरंग महाराज गीरी, विशाल महाराज खोले, चंद्रकांत महाराज खळेकर यांची किर्तने झाली.दररोज दुपारी तीन ते पाच या वेळेत ह.भ.प.रामराव महाराज घनवट यांच्या सुमधुर आवाजात रामायण कथेचे आयोजन करण्यात आले होते.शेवटी किर्तन केसरी ह.भ.प.अक्रुर महाराज साखरे यांच्या काल्याच्या किर्तनाने महाप्रसादानंतर या सोहळ्याची सांगता झाली.या सोहळ्यासाठी आळंदी येथील गायणाचार्य मल्लिनाथ महाराज सुर्यवंशी, राहुल महाराज करंजकर, नितीन महाराज परभणे, हनुमान महाराज मुंढे, रामेश्वर महाराज मिसाळ, ओंकार महाराज राजपूत, कल्याण महाराज सावळे, यांनी काम पाहिले,तर म्रुदंगाचार्य म्हणून अक्षय महाराज नागवडकर,सागर महाराज पठारे, ओंकार महाराज पाटील, भागवत महाराज हुलगे, यांनी काम पाहिले.शिक्रापुर येथील साई साउंड सिस्टीम चे मालक केशव मोरे, ज्ञानेश्वर शिंदे यांनी सुमधुर आवाजाचा चोख बंदोबस्त ठेवला.या सोहळ्यासाठी सर्व ह.भ.प.एकनाथ शिंदे, शिवाजी क्षीरसागर, महादेव मोटकर, माणिक धतुरे, अर्जुन निकम, अरुण कोळेकर, सदाशिव बन, पांडुरंग निकम, सोमनाथ क्षिरसागर,गोरक्ष घुगे यांनी विशेष सहकार्य केले.या सोहळ्यासाठी घोटण पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.ह.भ.प.रामहरी महाराज निकम यांनी पाच वर्षांपूर्वी इवलेसे रोप लावियले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी यांची प्रचिती हा भव्य दिव्य सोहळा पाहताना घोटण ग्रामस्थांनी अनुभवली आहे.साखरे महाराज यांनी उपस्थित श्रोत्यांना महाभारतातील अनेक द्रुष्टांत सांगून भावनाविवश करीत मंत्रमुग्ध केले.महीलांच्या उपस्थितीमुळे सर्व गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.