एम. एम. महाविद्यालयात ‘कॅन्सर मुक्त भारत’ या विषयावर व्याख्यान
पाचोरा दि. 11-पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील विद्यार्थी विकास विभाग व स्टॉप कॅन्सर मिशन मल्टीपर्पस सोसायटी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 10 फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात ‘कॅन्सर मुक्त भारत’ अभियानांतर्गत जळगाव येथील कॅन्सर समुपदेशक श्री. शुभम कामीडवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी आपल्या सादरीकरणाच्याद्वारे कॅन्सर आजाराचे प्रकार, कॅन्सर होण्याची कारणे, कॅन्सर टाळण्यासाठीची क्रिया याची मांडणी केली. धूम्रपान, शीतपेय, मद्यपान, चायनीज पदार्थ, चिप्स, बर्गर व कुरकुरे यांच्या सतत सेवनामुळे व चुकीच्या खाद्य संस्कृतीमुळे कॅन्सर होण्याचे प्रमाण 10 टक्क्याने वाढते. कॅन्सर आजार बरा करणे कठीण असल्यामुळे कॅन्सर होऊ नये म्हणून प्रत्येक व्यक्तीने त्या संदर्भातल्या सतत तपासण्या कराव्यात. त्यात होल बॉडी चेकअप, सी.बी.सी., ब्रेस्ट सोनोग्राफी व पंचकर्म याद्वारे कॅन्सर होण्यापासून बचाव करता येऊ शकतो असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान IQAC समन्वयक प्रा. एस. टी. सूर्यवंशी यांनी भूषविले. त्यांनी हे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी समाजापर्यंत पोहोचवावे असे आवाहन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. शिरीष पाटील, प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. पी. एम. डोंगरे, प्रा. वाय. बी. पुरी, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अतुल पाटील, डॉ. शरद पाटील, डॉ. माणिक पाटील, महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शारदा शिरोळे, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. प्रदीप रुद्रसवाड, सह विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. अमित गायकवाड, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. सरोज अग्रवाल, प्रा. सुवर्णा पाटील, डॉ. वैष्णवी महाजन, प्रा. प्राजक्ता देशमुख, प्रा. मेघा गायकवाड, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील भोसले, प्रास्ताविक डॉ. शारदा शिरोळे तर आभार प्रा. अमित गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. शारदा शिरोळे, प्रा. अमित गायकवाड, श्री. जावेद देशमुख, श्री. जयेश कुमावत, श्री. बापू वडर, कु. अश्विनी पाटील व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.