पाचोरा भडगाव तालुक्यात इंग्रजी व मराठी जनजागृती मोहीम
पाचोरा – शितल अकॅडमी पाचोरा व महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद जळगाव (महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा -भडगाव तालुक्यातील ५० माध्यमिक शाळांमध्ये “इंग्रजी जनजागृती मोहीम” हाती घेण्यात आली आहे.
पाचोरा शहर , तालुका व भडगाव तालुक्यातील निवडक शाळांचा समावेश या योजनेत करण्यात आलेला आहे. या प्रकल्प अंतर्गत प्रत्येक शाळेतील वर्गनिहाय मुलांचे इंग्रजी विषय ज्ञान एका चाचणी परीक्षा द्वारे तपासले जाणार आहे. वर्गातील पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण मुलांना (३ मुली व ३ मुले ) प्रोत्साहन पर शिष्यवृत्ती दिली जाईल. यातूनच प्रत्येक शाळेतील 4 मुलांची (२ मुले व २ मुली )निवड पुढील पातळीसाठी करण्यात येईल. अशा पद्धतीने 50 शाळांमधील प्रत्येकी 4 याप्रमाणे 200 हुशार परंतु गरजू विद्यार्थ्यांना आयोजकांमार्फत शितल अकॅडमी (इंस्टिट्यूट ऑफ इंग्लिश कम्युनिकेशन आणि पर्सनालिटी डेव्हलपमेंट )यांच्यातर्फे इंग्लिश विषयाचे पालकत्व स्वीकारले जाणार आहे
तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राप्त गुणानुसार शिष्यवृत्ती दिली जाईल.
केवळ इंग्रजी विषयाचे ज्ञान वाढवणे एवढाच हेतू नसून, निवड झालेल्या मुलांच्या सामाजिक व सेवाभावी संस्थांच्या मदतीने भावी शैक्षणिक गरजा, दिशादर्शन, मार्गदर्शन व सहकार्यासाठी पालकत्व घेण्यासाठी वचनबद्ध असल्याचे शितल अकॅडमी चे संचालक प्रा. रोहन पाटील व महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी शिंदे यांनी बोलताना सांगितले. या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी महेश ठाकरे सर (संचालक शितल अकॅडमी ,भडगाव) विकी चव्हाण, लोकेश पाटील, आदी शिक्षक व सहयोगी शिक्षक संघटना यांचे सहकार्य आहे.